‘शेरशाह’ चित्रपट आणि सिद्धार्थच्या जबरदस्त अभिनयावर होतोय कौतुकांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 09:57 AM2021-08-13T09:57:34+5:302021-08-13T09:58:27+5:30

Shershaah Movie : ‘शेरशाह’ ऑनलाइन रिलीज झाल्याच्या काही तासांतच, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे 

Shershaah Movie Sidharth Malhotra's earnest performance shines in this decent | ‘शेरशाह’ चित्रपट आणि सिद्धार्थच्या जबरदस्त अभिनयावर होतोय कौतुकांचा वर्षाव

‘शेरशाह’ चित्रपट आणि सिद्धार्थच्या जबरदस्त अभिनयावर होतोय कौतुकांचा वर्षाव

Next
ठळक मुद्दे  विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात शिव पंडित, हिमांशू मल्होत्रा, निकितिन धीर आणि साहिल वैद यांच्याही भूमिका आहेत.

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani ) स्टारर ‘शेरशाह’ (Shershaah) काल अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला.  चित्रपट ऑनलाइन रिलीज झाल्याच्या काही तासांतच, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे  नेटिझन्सकडून तर सोशल अकाऊंटवरून चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे, जणू सर्वत्र चित्रपटाचे वर्चस्व आहे.

चित्रपटाला ‘पॉवर पॅक्ड’ म्हणत, ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श म्हणतात की, ‘शेरशाह’ कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्राच्या (पीव्हीसी)   शौर्याला  आणि धैर्याला प्रेरणादायी आणि भावनिकपणे सलामी देतेय.  सिद्धार्थ मल्होत्रा साठी हा चित्रपट  गेम चेंजर ठरेल. उत्कृष्ट...

  आघाडीचे चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट केले, ‘कारगिल युद्धातील नायक कॅप्टन -विनर विक्रम बत्रा यांची प्रेरणादायी कथा!  सिद्धार्थ मल्होत्राची त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. कियारा आडवाणी उत्तम आहे. विष्णू वर्धन यांची भारताच्या युद्ध नायकांपैकी एक राजसी कथा, योग्य क्षणांसह यथार्थवाद आणि अंगावर काटे आणते. 
  तेव्हापासून हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.  एवढेच नाही तर ‘शेरशाह’चे आयएमडीबी रेटिंग 9.4 आहे, जे दर्शवते की त्याने प्रेक्षकांसह देखील योग्य ताळमेळ बसवला आहे.

एका ट्विटर युजर ने पोस्ट केले की, ‘सिद्धार्थ मल्होत्राच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी! हा चित्रपट उत्कृष्टपणे अंमलात आणला गेलाय. ‘शेरशाह’ बघायला विसरू नका.  कॅप्टन विक्रम बत्रा अमर आहेत, ‘ये दिल मांगे मोअर’....

दुसऱ्या एका युजरने ट्वीट केले, ‘आत्ताच ‘शेरशाह’ चित्रपट पाहिला आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला अश्रू अनावर झालेत आणि मी खरोखरच ब्लँक झालोय. हा चित्रपट विलक्षण आहे. अविश्वसनीय अनुभव. मला तुझा अभिमान आहे सिद्धार्थ मल्होत्रा. तुम्हीं करून दाखवलं! 
 
  विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात शिव पंडित, हिमांशू मल्होत्रा, निकितिन धीर आणि साहिल वैद यांच्याही भूमिका आहेत.

Web Title: Shershaah Movie Sidharth Malhotra's earnest performance shines in this decent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app