कौनसा नशा है मॅडम? ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालानं एअरपोर्टवर असं काही केलं की सगळेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:10 PM2021-12-05T18:10:53+5:302021-12-05T18:11:15+5:30

Shefali Jariwala : सध्या शेफाली पती पराग त्यागीसोबत हॉलीडेवर आहे. पण त्याआधी विमानतळावर तिनं असा काही धुमाकूळ घातला की, बघणारेही अवाक् झालेत.

shefali jariwala brutally trolled for dancing at the airport while boarding for the flight | कौनसा नशा है मॅडम? ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालानं एअरपोर्टवर असं काही केलं की सगळेच अवाक्

कौनसा नशा है मॅडम? ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालानं एअरपोर्टवर असं काही केलं की सगळेच अवाक्

googlenewsNext

‘बिग बॉस 13’मध्ये स्पर्धक म्हणून सामील झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala ) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. 2002 मध्ये शेफालीचा पहिला म्युझिक व्हिडीओ आला आणि या व्हिडीओनं असा काही धुमाकूळ घातला की, आजही शेफाली ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. हीच  ‘कांटा लगा गर्ल’ सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

सध्या शेफाली पती पराग त्यागीसोबत हॉली डेवर गेली आहे. पण त्याआधी विमानतळावर तिनं असा काही धुमाकूळ घातला की, बघणारेही अवाक् झालेत.
तर विमानतळावरचा हा व्हिडीओ खुद्द शेफालीने शेअर केला आहे. यात शेफाली विमानतळावर दिसतेय. विमानात बसण्यापूर्वी शेफाली इतकी काही एक्ससाईटेड झाली की, चक्क विमानतळावरच नाचायला लागली. डान्सही असा की, तिला पाहून सगळेच थक्क झालेत.

लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि शेफालीला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘कौनसा नशा है मॅडम’, असा सवाल एका युजरने केला. काहींनी तर शेफालीची चांगलीच खिल्ली उडवली. बघ, नाही तर लोक फिट आली म्हणतील, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली. अनेकांनी तर ही वेडी झाली की काय, कसे कसे नमूने पाहायला मिळतात, अशा आशयाच्या कमेंट्स केल्यात.

2002 मध्ये  कांटा लगा या गाण्याने शेफाली जरीवाला एकच धूम केली होती.  या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर 2004 मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली होती. 2014 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेफाली फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.  

Web Title: shefali jariwala brutally trolled for dancing at the airport while boarding for the flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.