"मला माधुरी दीक्षित बनायचं", 'बंटी और बबली 2' स्टार शर्वरी वाघने व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:12 PM2021-11-26T13:12:03+5:302021-11-26T13:13:26+5:30

शर्वरी वाघ बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितला आपला आदर्श मानते. माधुरीप्रमाणेच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्याची तिची इच्छा असल्याचे तने म्हटले आहे.

Sharvari Wagh fame of Bunty & Bubly2 expresses herself to become like Madhuri Dixit, check details | "मला माधुरी दीक्षित बनायचं", 'बंटी और बबली 2' स्टार शर्वरी वाघने व्यक्त केली इच्छा

"मला माधुरी दीक्षित बनायचं", 'बंटी और बबली 2' स्टार शर्वरी वाघने व्यक्त केली इच्छा

googlenewsNext

नवोदित अभिनेत्री शर्वरी वाघने पहिलाच सिनेमा 'बंटी और बबली 2' मधून  आपल्या अभिनयाने रसिकांसह समीक्षकांचीही चांगलीच पसंती मिळवली आहे.आपल्या अभिनयाच्या जोरावरच तिने स्वतःला सिद्ध करुन दाखवले आहे. शर्वरी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितला आपला आदर्श मानते. माधुरीप्रमाणेच इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्याची तिची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. 

शर्वरी सांगते की, “एक महाराष्ट्रीय असल्याने मी माधुरी दीक्षितलालाच आपला आदर्श ठेवत लहानाची मोठी झाले. मीच काय तर  माझे कुटुंब माधुरीचे मोठे चाहते आहेत. माझ्यासारख्या महाराष्ट्रातील प्रत्येक कालाकाराला माधुरी दीक्षित प्रमाणेच लोकप्रियता मिळवायची आहे. तिच्यासारखी अदाकारी करता यावी यासाठी कायमच मी प्रयत्नशील असते. मी लहानपणापासून तिच्या गाण्यावर थिरकत आलीय, तिच्या सिनेमातील सीनवर अभिनयसुद्धा करायचे.”

ती पुढे म्हणाली की, “माधुरी दीक्षितलाच डोळ्यासमोर ठेवत मी काम करण्याचा प्रयत्न करते. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 'बंटी और बबली 2' मध्ये माझ्या कामाला पसंती मिळते,लोकांनी ज्याप्रकारे माझे कौतुक केले, यासाठी सगळ्यांचे आभार मानते.

इंडस्ट्रीत माझ्यावर कोणाचाही वरदहस्त नसताना मला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. माझ्यासाठी हे इतकं सोपं नव्हते. त्यासाठी मला स्ट्रगलही करावे लागले. अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. पण हार मानली नाही. जिद्द आणि मेहनत यामुळे मी स्वतःला सिद्ध करु शकले. चाहत्यांनी ज्याप्रकारे माझ्या अदाकारीचे कौतुक केले, स्वीकारले त्याविषयी आनंद वाटतो. माझ्यादृष्टीने ते फार महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात ती एक ‘आऊटसायडर’ आहे. चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यापुढेही चांगले काम करत रसिकांचे भरघोस मनोरंजन करत राहणार असल्याचे तिने म्हटले आहे. 


याविषयी  शर्वरी सांगते, “माझ्या मते, जे कलाकार आऊटसायडर असतात, त्यांना स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागते.त्यासाठी आपण प्रचंड मेहनतही घेतो. त्यामुळे आपण चांगले काम करु शकतो असे वाटते. आता कधी एकदा माझा दुसरा सिनेमा प्रदर्शित होतो आणि चाहते तो पाहतात असे झाले आहे. यापुढेही चांगले काम मिळत राहावे आता  मला आव्हानात्मक कामाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Sharvari Wagh fame of Bunty & Bubly2 expresses herself to become like Madhuri Dixit, check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.