ठळक मुद्दे शरद केळकर शुभम सिन्हा दिग्दर्शित चित्रपटात साकारणार फुटबॉल कोचची भूमिका शरद केळकर हाऊसफुल ४ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

भूमी, मोहेंजोदारो व लय भारी अशा हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता शरद केळकर हिंदी चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद केळकर शुभम सिन्हा दिग्दर्शित चित्रपटात फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. शुभम सिन्हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. या चित्रपटाची कथा एका व्यक्तीच्या जीवनातील संघर्षावर आधारीत असून हा व्यक्ती कॉलेज जीवनात खेळात निपुण असतो. या चित्रपटाचे शीर्षक अवैध असल्याचे सूत्रांकडून समजते आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगला मेमध्ये सुरूवात होणार आहे.


 बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन व अजय देवगण यांनी फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. अजयने भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिमच्या बायोपिकमध्ये आणि अमिताभ बच्चन यांनी झुंडमध्ये फुटबॉल ट्रेनरचा रोल केला आहे. आता शरद केळकरला फुटबॉल कोचच्या भूमिकेत पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.


तसेच शरद अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या हाऊसफुल ४ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शरद म्हणाला, ''मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच त्याच भूमिका परत करायला आवडत नाहीत. मला प्रखर भूमिका साकारायला आवडतात.'' रितेश देशमुखसोबत काम करण्याची शरदची ही दुसरीवेळ आहे.

याआधी त्यांने रितेशसोबत 'लयभारी' सिनेमात काम केले होते. 

Web Title: Sharad Kelkar will play the role for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.