ठळक मुद्दे गौरीने अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरांचे इंटीरियरही केले आहे. करण जोहरच्या मुलांची रूम तिनेच सजवली होती.

किंगखान शाहरूख खानची पत्नी केवळ हीच गौरी खानची ओळख नाही. इंटीरियर डिझाईन क्षेत्रात गौरी खान हे एक मोठे नाव आहे. साहजिकच गौरीने आपल्या अभिरूचीनुसार ‘मन्नत’ हा बंगला सजवला आहे. ‘मन्नत’चे इनसाईड फोटो पाहिल्यानंतर कुणीही थक्क होईल, असे हे फोटो आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदा ‘मन्नत’चे इनसाईड फोटो समोर आले आहेत. जगप्रसिद्ध वोग (vogue) या मॅगझिनमध्ये  ‘मन्नत’चे इनसाईड फोटो प्रकाशित झाले आहेत. यात गौरीची मुलाखतही आहे. 


गौरीने ‘मन्नत’च्या वेगवेगळ्या भागात फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो गौरीने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. ‘घरातील सुंदर व्यक्तिंमुळे घर सुंदर बनते,’ असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.


आपल्या या घराबद्दल गौरी कमालीची हळवी आहे. कारण घरातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जागा तिने स्वत: सजवली आहे. ती सांगते, आमच्या घरात नेहमी गोंधळ सुरु असतो. याचे कारण म्हणजे, छोटा अबराम. आमच्या घरात कुठलाही असा नियम नाही. मुले शाळेतून येतात तेव्हा मी त्यांना घरात भेटते. आईला बघून त्यांना आनंद होतो. घर सजवण्यात घरातील प्रत्येक व्यक्तिचे योगदान आहे. सगळ्यांनी स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

 मुलांची आणि पतीची आवड ध्यानात घेऊन गौरीने ‘मन्नत’ डिझाईन केले आहे. यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. जगभरातील प्रवासादरम्यान तिने एकापेक्षा एक खास वस्तूंची खरेदी केली आणि त्या घरात सजवल्या.


 गौरीने अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरांचे इंटीरियरही केले आहे. करण जोहरच्या मुलांची रूम तिनेच सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस. सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही घरांचे इंटिरियर केले होते.  

Web Title: shahrukh khan wife gauri khan photoshoot inside mannat for vogue magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.