Shahrukh khan reveals reason why he took son abram to vote for the lok sabha elections | शाहरुखने सांगितले अबरामला मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे कारण, वाचून तुम्हाला येईल हसू   
शाहरुखने सांगितले अबरामला मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे कारण, वाचून तुम्हाला येईल हसू   

ठळक मुद्देशाहरुखने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन अबरामला सोबत घेऊन जाण्यामागचे कारण सांगितलेशाहरुखने या फोटोला एक कॅप्शन दिले आहे

सोमवारी झालेल्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात बॉलिवूड सेलिब्रेटीनीदेखील आपल्या मतदानाची जबाबदारी पार पडली. शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलगा अबरामला घेऊन मतदान केंद्रावर पोहोचला होता. यासंदर्भात शाहरुखने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन अबरामला सोबत घेऊन जाण्यामागचे कारण सांगितले.


याच मागचे कारण खरचं खूप क्युट आहे शाहरुख खान आणि गौरीला अबरामला मतदानाची प्रक्रिया समजवून सांगायची होती. शाहरुखने या फोटोला एक कॅप्शन दिले आहे, ''अबराम बोटिंग आणि वोटिंगला घेऊन थोडा कंफ्युज झाला होता. त्यामुळे या दोघांमधला फरक समजवण्यासाठी मी त्याला मी मतदान केंद्रावर घेऊन गेला.''

  
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर गतवर्षी आलेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, 'माझ्याकडे सध्या कुठलाच प्रोजेक्ट नाही. मी कोणत्याच चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करत नाहीये. साधारणपणे असं होतं की, तुम्ही जेव्हा  एका प्रोजेक्टवर काम करत असता तेव्हा तुमच्या हातात दुसरा प्रोजेक्ट असतो. ३-४ महिन्यात मी पुढच्या प्रोजेक्टमध्ये अंतर्मुख होऊन जातो. मात्र, यावेळेस तसे झालेच नाही. माझे मन मला परवानगीच देत नाहीये. मला असं वाटतं की, मी अजून थोडा वेळ घेतला पाहिजे, काही सिनेमा पाहायला हवेत त्यासोबतच काही पुस्तके वाचली पाहिजेत.’ 

Web Title: Shahrukh khan reveals reason why he took son abram to vote for the lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.