ठळक मुद्देसना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.  

१९९८ साली प्रदर्शित झालेला ‘कुछ कुछ होता है’ आठवत असेल तर त्यातली चुलबुली अंजलीही हमखास आठवत असणार. आता ही चिमुकली  21 वर्षांची झालीय. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सना सईद हिच्याबद्दल. सनाने  शाहरूखची मुलगी अंजलीची  भूमिका साकारली होती. सध्या सनाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सनाने स्वत: पांढ-या रंगाच्या बोल्ड आऊटफिटमधील हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या बोल्ड अदा चाहत्यांना वेड लावणा-या आहेत.
रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड असलेली सना सर्रास ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते. यापूर्वीही तिचे असे अनेक बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.

‘कुछ कुछ होता है’मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदने या चित्रपटानंतर ‘बादल’ व  ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटात काम केले. मात्र या चित्रपटानंतर सना बराच काळ रुपेरी पडद्यावर दिसली नाही. 

चित्रपटांव्यतिरिक्त सना सईदने टेलिव्हिजनवरील मालिकेत काम केले आहे.   बाबुल का आंगन छूटे ना, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस व  लाल इश्क  या मालिकेत तिने काम केले आहे.

तसेच  झलक दिखला जा ६,झलक दिखला जा ७, नच बलिए ७ आणि  झलक दिखना जा ९ या रिएलिटी शोमध्येदेखील ती दिसली होती.


२०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या चित्रपट ‘स्टुडंट आॅफ द ईयर’मध्येही सना झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. या चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट मुख्य भूमिकेत होते.

सना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahrukh khan onscreen daughter sana saeed latest hot and bold photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.