इतना शो ऑफ मत करो... ; सुहाना खानचा bold फोटो पाहून युजर्सनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:14 PM2019-09-06T12:14:24+5:302019-09-06T12:15:21+5:30

. होय, अनेकांनी सुहानाचा हा फोटो पाहिला आणि कपड्यांवरून तिला सल्ला देणे सुरु केले.

shahrukh khan daughter suhana khan troll on social media for bold dress | इतना शो ऑफ मत करो... ; सुहाना खानचा bold फोटो पाहून युजर्सनी दिला सल्ला

इतना शो ऑफ मत करो... ; सुहाना खानचा bold फोटो पाहून युजर्सनी दिला सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. ती कधी डेब्यू करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. क्षणात व्हायरल होतात. सध्याही सुहानाचा एक नवा फोटो असाच व्हायरल होतोय. या फोटोत सुहाना नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय. अर्थात काही लोकांना तिचे कपडे खटकल्याचे दिसतेय. होय, अनेकांनी सुहानाचा हा फोटो पाहिला आणि कपड्यांवरून तिला सल्ला देणे सुरु केले.


सुहानाच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात सुहानाच्या ओठांवर गोड हसू आहे, हातात कॉफीचा मग आहे. पण तिचा ड्रेस म्हणाल तर अनेकांना आवडला नाही. मग काय नेटक-यांनी तिला अनेक सल्ले देणे सुरु केले. ‘इतके शो ऑफ करू नकोस. नॉर्मल कपडे घातलेस तरी सुंदर दिसशील,’ असे एका युजरने तिला सुनावले. अन्य एका युजरने, तिला ड्रेस ठीक करण्याचा सल्ला दिला. एका युजरने तर ‘तू शाहरूख खानची मुलगी आहेस. तुला इतके शो ऑफकरण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत तिला सुनावले. 


अर्थात सुहानाने यापैकी कुठल्या कमेंटला उत्तर दिले नाही. कारण स्पष्ट आहे, सुहाना अशा प्रतिक्रियांची पर्व करत नाही. खरे तर ती स्वत: इन्स्टाग्रामवर नाहीच. तिचे फॅन क्लब तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करतात आणि फॅन क्लब अशा प्रतिक्रियांमुळे सुहानाचे फोटो शेअर करणे थांबवणार नाहीत.


गेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. ती कधी डेब्यू करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण तूर्तास सुहाना शिकतेय आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय बॉलिवूड करिअर नाही, हे तिच्या डॅडने तिला कधीच सांगितले आहे.

Web Title: shahrukh khan daughter suhana khan troll on social media for bold dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.