shahrukh khan and deepika padukone to join hands for atlees next sanki | ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

ठळक मुद्दे‘सनकी’ या सिनेमात दीपिका व शाहरूखची जोडी दिसलीच तर या जोडीचा एकत्र असा हा चौथा सिनेमा असेल. 

ट्विटरवर सध्या ‘सनकी’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. कारण काय तर तर दीपिका पादुकोण व शाहरूख खानचा आगामी सिनेमा. होय, शाहरूख खान पुन्हा एकदा दीपिकासोबत दिसणार असल्याचे कळतेय. अद्याप या सिनेमाची घोषणा झालेली नाही. पण चित्रपटाची कथा एसआरकेला खूप आवडल्याचे कळतेय. कथा ऐकल्याबरोबर शाहरूखने या सिनेमासाठी होकार दिल्याचे आणि या चित्रपटाचे नाव ‘सनकी’ असल्याचे कळतेय. हेच कारण आहे की ट्विटरवर ‘सनकी’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

बॉलिवूडचा किंगखान सुमारे 2 वर्षांपासून स्क्रिनपासून दूर आहे. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाकडून किंगखानला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा सिनेमा फ्लॉप झाला आणि यामुळे शाहरूख त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या चिंतनात मग्न झाला. गेल्या 2 वर्षांत त्याने एकही सिनेमा साईन केलेला नाही. मात्र आता शाहरूख पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे कळतेय.
‘सनकी’ हा एक रोमॅन्टिक ड्रामा असणार आहे. हिंदी व तामिळ भाषेत मूळ रूपात चित्रपट बनवला जाईल आणि अन्य भाषेत तो डब केला जाईल. तामिळ सिनेमाचे दिग्गज दिग्दर्शक एटली हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचेही कळतेय. एटली यांना बिजिल, मर्सल, थेरी, राजा राजी या तामिळ सुपरहिट सिनेमांसाठी ओळखले जाते.

तर चौथ्यांदा जमणार जोडी
‘सनकी’ या सिनेमात दीपिका व शाहरूखची जोडी दिसलीच तर या जोडीचा एकत्र असा हा चौथा सिनेमा असेल. यापूर्वी ओम शांतीओम, चेन्नई एक्स्प्रेस आणि हॅपी न्यू ईअर या सिनेमांत ही जोडी दिसली आहे.

‘पठान’मुळेही चर्चेत
शाहरूख खान सध्या ‘पठान’ या सिनेमामुळेही चर्चेत आहे. सूत्रांचे खरे मानाल तर यशराज फिल्म्स स्टुडिओला 50 वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर शाहरूखच्या या सिनेमाची घोषणा केली जाणार आहे. या आगामी सिनेमात शाहरूख जॉन अब्राहमसोबत दिसणार असल्याचेही कळतेय. हा सिनेमा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे.

दीड वर्षांपासून घरी बसलाय शाहरूख खान, पण तरीही सलमान, अक्षयपेक्षा आहे दुप्पट ‘रईस’

शाहरूख खानने का नाकारला ‘स्लमडॉग मिलेनियर’? हैराण करणारे आहे कारण

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shahrukh khan and deepika padukone to join hands for atlees next sanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.