Shahid Kapoor will play this role in 'Mahabharat' | शाहिद कपूर 'महाभारत'मध्ये साकारणार ही भूमिका

शाहिद कपूर 'महाभारत'मध्ये साकारणार ही भूमिका

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आगामी चित्रपट जर्सीबाबत चाहत्यांमध्ये क्रेझ पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहेत आणि हा चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. तसेच शाहिद कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे आणि त्यामुळे तो चर्चेत आहे. तो दिग्दर्शक राज अँड डीकेच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत राशी खन्ना दिसणार आहे. यादरम्यान आता शाहिद कपूरसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या महाभारत चित्रपटात कर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


पिंकव्हिला रिपोर्टनुसार, जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिद कपूरला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली आहे. तो रुपेरी पडद्यावर कर्णाची भूमिका साकारणार आहे. हा एक मायथोलॉजिकल ड्रामा चित्रपट असणार आहे. आता निर्माते हा चित्रपट २०२३ला रिलीज करण्याची योजना करत आहे.

राकेश, रोनी आणि शाहिदने चित्रपट भव्य स्तरावर बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाला सुरू करण्याआधी खूप तयारी करावी लागणार आहे. दुसऱ्या तयारीशिवाय शाहिद चित्रपटासाठी शारीरिक ट्रान्सफॉर्मेशनदेखील करणार आहे.


राकेश ओम प्रकाश मेहराने यापूर्वी निर्माता रोनी स्क्रूवालासोबत दिल्ली ६, रंग दे बसंती या सारख्या चित्रपटात काम केले आहे. इतकेच नाही तर रोनी स्क्रूवाला विकी कौशल अभिनीत अश्वथामामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार करत आहे. यात विकी कौशलसोबतसारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shahid Kapoor will play this role in 'Mahabharat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.