Shahid kapoor signs rs 100 crore deal with Netflix | शाहिद कपूरने नेटफ्लिक्ससोबत साइन केली १०० कोटी रूपयांची डील, या प्रोजेक्ट्सवर करेल काम

शाहिद कपूरने नेटफ्लिक्ससोबत साइन केली १०० कोटी रूपयांची डील, या प्रोजेक्ट्सवर करेल काम

कोरोनाचा फटका फिल्म इंडस्ट्रीलाही बसला आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतरही सरकारने थिएटर उघडण्याचे आदेश दिलेले नाहीत. ज्यामुळे निर्मात्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अशात निर्माते त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे सिनेमे डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेत आहेत.

गेल्या महिन्यात आयुष्मान खुराणा आणि अमिताब बच्चन यांचा 'गुलाबो-सिताबो', विद्युत जामवाल चा 'खुदा हाफिज', कुणाल खेमूचा 'लूटकेस' आणि आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्तचा 'सड़क 2' सहीत अनेक सिनेमे ऑनलाइन रिलीज करण्यात आले आहेत. अशात बॉलिवूडमधील टॉप स्टार्सना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगामी सिनेमांसाठी चांगली रक्कम दिली जात आहे. या लिस्टमध्ये आता अभिनेता शाहिद कपूरचं नाव जोडलं गेलं आहे. 

 पिंकविलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदला नेटफ्लिक्सने काही नव्या प्रोजेक्ट्ससाठी साइन केलंय. इतकेच नाही तर शाहीदने या प्रोजेक्ट्ससाठी नेटफ्लिक्ससोबत १०० कोटी रूपयांची डील साइन केल्याची चर्चा आहे. शाहीद केवळ नेटफ्लिक्स सिनेमा किंवा सीरिजसोबत आपलं डिजिटल डेब्यू करेल इतकंच नाही तर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करेल. त्यातील कॉन्सेप्ट ड्रिवेन फिक्शन सीरीज आहे. पण शाहिदने याची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही.

शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'जर्सी' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं शूटींग मधेच थांबवण्यात आलं होतं.  गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

या सिनेमासोबतच शाहिदने आदित्य निंबाळकरचा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाही साइन केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिदचा हा सिनेमा नेटफ्लिक्सच्या अंतर्गतच आहे. दरम्यान शाहिद कपूरआधी हृतिक रोशनने  ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत ८० कोटी रूपयांची डील साइन केली आहे.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पुन्हा प्रेग्नेंट?, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो होतोय व्हायरल

फोटोशूटमधून मीरा राजपूतने केले होते सिद्ध, हाउस वाइफही दिसू शकतात ग्लॅमरस, पहा फोटो

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shahid kapoor signs rs 100 crore deal with Netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.