फोटोशूटमधून मीरा राजपूतने केले होते सिद्ध, हाउस वाइफही दिसू शकतात ग्लॅमरस, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 07:24 PM2020-07-16T19:24:46+5:302020-07-16T19:26:57+5:30

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी ती बऱ्याचदा चर्चेत येत असते.

बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी बऱ्याचदा ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

इतकेच नाही तर मीराचे सेलिब्रेटीं एवढाच फॅन फॉलोव्हिंग आहे. मीराने सिद्ध केलंय की ग्लॅमरस दिसण्यासाठी सेलिब्रेटी असण्याची गरज नाही. हाउस वाइफदेखील ग्लॅमरस दिसू शकते.

मीराने पहिले मॅगझिन फोटोशूट हेलो मॅगझिनसाठी केले होते. सिंगल फोटोसोबत नवरा शाहिद कपूरसोबतही फोटोशूट केले होते. 

फोटो जेव्हा समोर आले तेव्हा ते पाहून विश्वासच बसला नाही की हे मीराचे पहिले मॅगझिन फोटोशूट होते. कारण तिचा कॉन्फिडंस व पोझ मॉडेल किंवा सेलिब्रेटींसारखीच होती.

2019 साली मीराने नवरा शाहिद कपूरसोबत व्होग मासिकासाठी फोटोशूट केले होते. 

मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये शाहिद पेक्षा मीराच्या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

मीरा राजपूतच्या या फोटोशूटने सिद्ध केले होते की, ती एक कॉन्फिडेंट व ग्लॅमरस बाला आहे, जशी आहे तशी राहून लोकांचे मन जिंकू शकते.