Shah Rukh Khan takes hours to dress up, says Gauri Khan | पत्नी गौरी खानने सांगितले शाहरूख खानचे ‘सीक्रेट’!!
पत्नी गौरी खानने सांगितले शाहरूख खानचे ‘सीक्रेट’!!

ठळक मुद्दे शाहरूख व गौरी यांनी १९९१ मध्ये लग्न केले. त्यांना अबराम,आर्यन आणि सुहाना अशी तीन मुले आहेत

अलीकडे  शाहरुख खानगौरी खान  या बॉलिवूडच्या ‘मेड फॉर इच अदर’ कपलने ‘मोस्ट स्टाईलिश कपल’च्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आणि या निमित्ताने किंगखान शाहरूखचे एक ‘सीक्रेट’ जगासमोर आले. होय, खुद्द शाहरूखची पत्नी गौरीने हे ‘सीक्रेट’ उघड केले.
अवार्ड शोमध्ये शाहरूख व गौरी दोघेही पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहरूखने गौरीला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. पण हे काय? दोन शब्द बोलण्याऐवजी गौरीने पतीचे ‘सीक्रेट’ सगळ्यांना सांगून टाकले. आज मला तुम्हाला एक ‘सीक्रेट’ सांगायचे आहे, या वाक्याने गौरीने सुरुवात केली.

‘ माझे स्टाईलशी काहीही देणेघेणे नाही, असे म्हणणा-या व्यक्तिला आज हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला तुम्हाला एक सीक्रेट सांगायचे आहे. आम्ही दोघेही जेव्हाकेव्हा एखाद्या पार्टीला जायला निघतो. तेव्हा मी जास्तीत जास्त २० मिनिटांत तयार होते. मी नेहमी वेळेवर तयार असते. पण शाहरूख तयार होण्यासाठी कमीत कमी २ ते ३ तास घेतो. आज या शोसाठी तयार व्हायला मी २ ते ३ तास वेळ घेतला आणि त्याने तब्बल ६ तास लावलेत,’ असे गौरी म्हणाली.

गौरी यापुढे आणखी काही बोलणार, तोच शाहरुखने तिला मध्येच थांबवले आणि ‘आज तू खरचं सुंदर दिसतेय,’ असे म्हणून विषय बदलला. यानंतर काय तर सगळ्यांमध्ये खसखस पिकली.
या शोचा व्हिडीओ गौरीने आपल्या सोशल अकाऊंटवर श्ेअर केला आहे. शाहरूख व गौरी यांनी १९९१ मध्ये लग्न केले. त्यांना अबराम,आर्यन आणि सुहाना अशी तीन मुले आहेत

Web Title: Shah Rukh Khan takes hours to dress up, says Gauri Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.