Shah Rukh Khan starts shoot for Pathan in Mumbai, new look goes viral | 'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान

'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरूख लवकरच पडद्यावर धमाका करणार आहे. तो अखेरचा २०१८ मध्ये 'झीरो' सिनेमात दिसला होता. आता तब्बल दोन वर्षांनी तो सिनेमाच्या सेटवर परतला आहे. त्याने त्याच्या 'पठाण' सिनेमाचं शूट सुरू केलंय. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंबईत सोमवारी शाहरूख खानला एका प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओबाहेर बघण्यात आलं. वाढलेल्या लांब केसांसोबत शाहरूखचा अंदाज खरंच 'किंग'सारखा दिसतोय.

शाहरूख खानचा 'पठाण' २०२१ मध्ये रिलीज होणार असल्याचं बोललं जातत आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन 'वॉर' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करणार आहे. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दीपिका आणि शाहरूख खानची जोडी एकत्र बघायला मिळणार आहे.

'मुंबई मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, 'पठाण' एक धमाकेदार अ‍ॅक्शन असलेला सिनेमा असेल. यात दीपिका सुद्धा अनेक अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ही एका गुप्तहेराची कथा असेल. सिनेमाच्या केंद्रस्थानी भलेही शाहरूख खान आणि त्याची भूमिका असेल, पण दीपिका या मिशनमध्ये शाहरूखची साथ देणार आहे.
सलमान आणि कतरिना करणार कॅमिओ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असेही सांगितले जात आहे की, मिशनवर शाहरूखला जोया आणि टायगर सुद्धा जॉइन करणार आहेत. म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफही 'टायगर फ्रॅंचायजी'च्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे. कोरोना संक्रमण बघता मुंबईतच या सिनेमाचं शूटींग होणार आहे. यासाठी खास स्टुडिओ तयार करण्यात आलाय. अशीही माहिती आहे की, जॉन अब्राहम यात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shah Rukh Khan starts shoot for Pathan in Mumbai, new look goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.