‘दोस्ताना 2’ या चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी राजकुमार राव आणि विकी कौशल या दोघांपैकी एकाची वर्णी लागणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहे. पहिल्या शेड्यूलमध्ये 20 दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास टाळाटाळ करायचा तसेच जान्हवी कपूरसह त्याचे फारसे पटत नव्हते. कार्तिकच्या अशा वागणुकीमुळे धर्मा प्रोडक्शनचे २० कोटी पाण्यात गेलेत. त्याच्यामुळे धर्मा प्रोडक्शनचे प्रचंड नुकसान झाले असे करण जोहरने कार्तिकवर आरोप लावलेत. इतकेच नाही तर 'दोस्ताना २'चे २० दिवसाचे शूट आता पुन्हा करावे लागणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.


कार्तिकला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर करणने त्याच्यासह मैत्रीदेखील तोडल्याचे समोर आले आहे. करणने कार्तिकला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.यावरुन आता करणला कोणत्याही प्रकारचा कार्तिकसह संबंध ठेवायचा नसल्याचे स्षष्ट होते. तसंच भविष्यात  कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.  

'दोस्ताना 2' वरुन पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. या संपूर्ण घटनाक्रमानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील या वादात उडी घेतली आहे. कंगनाने सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे.

 

कंगना राणौतने ट्विट करत लिहिले की, कार्तिक आर्यन आपल्या हिमतीवर इथपर्यंत पोहचला आहे आणि आपल्याच मेहनतीवर तो असे करत राहिल. फक्त वडील जो आणि त्यांची नेपो गँग क्लबला विनंती आहे की कृपया त्याला एकट्याला सोडा. 


सुशांत सिंग राजपूतसारखे त्याच्या मागे पडू नका की तो फासावर लटकण्यासाठी लाचार होईल. गिधाड्यांनो त्याला एकट्याला सोडा.त्यानंतर कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या समर्थनात पुढे आले आहेत.सोशल मीडियावर पुन्हा एकदा करण जोहरवर नेटीझन्स संताप व्यक्त करत आहेत.

 

करण जोहरने अनेकदा अशा प्रतिभावान कलाकारांना नेहमीच बाजुला करत त्यांच्या भविष्याशी खेळलाय. मात्र कार्तिक टॅलेंटेड अभिनेता आहे. त्याला करणजोहर सारख्यांची गरज नसल्याचे म्हणताना दिसतायेत. कार्तिकला सिनेमातून रिप्लेस केल्यानंतर करण मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Self-Made Kartik Aaryan Doesn't Need KJo', Netizens Furious After Actor Is Replaced From Dostana 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.