ठळक मुद्देबिहारच्या बेगुसराय येथे सपनाचा लाईव्ह प्रोगाम सुरू होता. सुदेश भोसले व हंसराज हंस यांच्यासह सपना या कार्यक्रमासाठी पोहोचली होती.मध्यरात्री १२ च्या सुमारास सपना स्टेजवर पोहोचली आणि गर्दीचा संयम सुटला. सपनाला जवळून पाहण्यासाठी लोक स्टेजकडे धावत सुटले.

बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या कार्यक्रमात गुरुवारी रात्र जोरदार धिंगााणा झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला.
बिहारच्या बेगुसराय येथे सपनाचा लाईव्ह प्रोगाम सुरू होता. सुदेश भोसले व हंसराज हंस यांच्यासह सपना या कार्यक्रमासाठी पोहोचली होती. मध्यरात्री १२ च्या सुमारास सपना स्टेजवर पोहोचली आणि गर्दीचा संयम सुटला.

सपनाला जवळून पाहण्यासाठी लोक स्टेजकडे धावत सुटले. यादरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकणे सुरू केले. या कार्यक्रमासाठी ५० हजारांवर लोक पोहोचले होते. या गोंधळात सपनाने २ गाणी सादर केलीत.

पण गर्दी अनियंत्रित झाल्याने आयोजकांना कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. गर्दी जुमानत नाहीये, हे पाहून पोलिसांना लाठीमार करावा लागला.

कार्यक्रमादरम्यान झालेली चेंगराचेगरी आणि लाठीमारात डझनावर लोक जखमी झालेत तर एका व्यक्तिचा मृत्यू झाला. मृताचे नाव साजन कुमार असल्याचे कळते. तो बडिया येथे राहणारा आहे.

सपनाची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.


Web Title: SEE PICS: sapna chaudhary program ruckus crowd massacre chair
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.