ठळक मुद्देसयानी सांगते, काही महिन्यांपूर्वी मी चित्रीकरणासाठी गुरूग्राम येथे गेली होती. त्यावेळी एका सार्वजनिक ठिकाणी माझ्यासोबत छेडछाड झाली होती. संध्याकाळी सहाची वेळ असेल ती... मला त्या गोष्टीचा प्रचंड राग आला होता.

सयानी गुप्ताने आजवर अनेक वेबसिरिजमध्ये काम केले आहे. तिने तिचे कॉलेजचे शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आहे. पण दिल्ली आता पूर्वीसारखी राहिली नाही असे तिने एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. दिल्ली मुलींसाठी सुरक्षित नसून तिच्यासोबत दिल्लीत छेडछाड झाली होती असे देखील तिने या मुलाखतीत सांगितले आहे.

सयानीने या मुलाखतीत सांगितले आहे की, माझे दिल्लीसोबत खूप जुने नाते आहे. पण आता दिल्ली खूपच बदलली आहे. दिल्ली पूर्वीसारखी राहिली नाही. त्यामुळे मी आता दिल्लीत असली तरी बाहेर जाण्याऐवजी घरी राहाणेच पसंत करते. माझे शिक्षण हे दिल्लीत झाले आहे. दिल्ली विश्वविद्यालयाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये मी शिक्षण घेतले. काही वर्षांपूर्वी मी दिल्लीत राहात असताना घराच्या बाहेर पडताना काय कपडे घालायचे हा मला विचार करावा लागत नसे. पण आता मला दहा वेळा या गोष्टीचा विचार करावा लागतो. 2004-2007 या काळात मी कॉलेजला होते, त्यावेळी मी बॅकलेस टॉप घालून डीटीसी बसमधून फिरायचे. त्यावेळी मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नाही. मी दिल्लीत असताना नोकरी देखील केली होती. त्यावेळी मला कामाच्या निमित्ताने घरी जायला उशीर व्हायचा. पण त्यावेळी घरी रात्री जाताना कशाही प्रकारचे दडपण नसायचे. मी रात्री दहा साडे दहाला प्रगती मैदानाच्या परिसरात फिरायचे. पण आता या परिसरात एवढ्या रात्री फिरायचा मुली विचार देखील करू शकत नाहीत. 

दिल्ली कशाप्रकारे बदलली आहे याविषयी सयानी सांगते, काही महिन्यांपूर्वी मी चित्रीकरणासाठी गुरूग्राम येथे गेली होती. त्यावेळी एका सार्वजनिक ठिकाणी माझ्यासोबत छेडछाड झाली होती. संध्याकाळी सहाची वेळ असेल ती... मला त्या गोष्टीचा प्रचंड राग आला होता. दिल्लीत माझ्यासोबत घडलेला तो प्रकार मी आजही विसरू शकत नाही. 2017 मध्ये मी आणि टिस्का चोप्रा एका वेबसिरिजच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी आमच्यासोबत काम करणारे ज्युनिअर आर्टिस्ट अतिशय विचित्र नजरेने मला आणि टिस्काला पाहात होते. आमच्याच सेटवर आम्हाला अवघडल्यासारखे वाटत होते. 

Web Title: Sayani Gupta Says Delhi Is No More Safe Place To Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.