ठळक मुद्देरिल लाईफमध्ये आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारे सतीश यांचे रिअल लाईफ दु:खानी भरलेले आहे

अनेक सिनेमांचे दिग्दर्शन करणारे आणि पडद्यावर अनेक यादगार व्यक्तिरेखा जिवंत करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक   (Satish Kaushik) यांचा आज वाढदिवस. ‘मिस्टर इंडिया’त  कॅलेंडरची भूमिका साकारणारे सतीश कौशिक आजत 65 वर्षांचे झालेत. 13 एप्रिल 1956 रोजी जन्मलेल्या सतीश यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. याचसोबत अभिनयाचा प्रवासही सुुरू केला होता. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. अभिनेता व्हायचे आहे म्हटल्यावर सुरुवातीला घरातूनच त्यांना प्रखर विरोध झाला होता.

अन् भावाने दह्याची वाटी फेकून मारली...
तीन बहिणी आणि एक भाऊ असलेल्या सतीश यांच्या कुटुंबाचा चित्रपटांशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण सतीश लहानपणापासूनच वेगळे होते. पण म्हणून ते चित्रपटात जाणार, असा विचारही त्यांच्या कुटुंबाने केला नव्हता. एकेदिवशी सतीश कौशिक यांनी मनाचा निश्चय केलाच. थेट मोठ्या भावासमोर जाऊन मला अभिनेता व्हायचेय, मी मुंबईला जातोय, असे त्यांनी एका श्वासात सांगून टाकले. पण त्यांचे हे शब्द ऐकून भाऊ इतका संतापला की,त्याने चक्क  पलंगच उचलून  सतीश कौशिक यांच्यावर फेकला. इतकेच नाही तर सतीश यांच्यापुढे ठेवलेली दह्याची वाटी देखील फेकून मारली. खुद्द सतीश यांच्या भावाने एका शोमध्ये ही घटना सांगितली होती.

भाऊ संतापला होता. पण सतीश ठाम होते. बनेन तर अभिनेताच, नाहीतर मी काहीच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सतीश यांच्या अभिनयाच्या वेडापायी घरात वाद सुरु झालेत. जेव्हा केव्हा सतीश अभिनेता होण्याबद्दल बोलत, तेव्हा तेव्हा घरात भांडणं व्हायची. भाऊ संतापून जायचा. अनेक दिवस हाच सिलसिला चालला आणि एक दिवस सतीश यांचा मुंबईला जाण्याचा इरादा पक्का झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना राखी बांधल्यानंतर सतीश कौशिक यांनी मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. भावाने  थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सतीश यांना थांबवू शकला नाही. इथून पुढे सतीश यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.

मुलाच्या मृत्यूने कोलमडले होते सतीश...
रिल लाईफमध्ये आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारे सतीश यांचे रिअल लाईफ दु:खानी भरलेले आहे. दोन वर्षांचा असताना त्यांचा मुलगा शानूचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूने सतीश पार कोलमडून गेले होते. मुलाच्या मृत्यूच्या 16 वर्षानंतर 2012 साली सरोगेसीद्वारे सतीश यांच्या घरी मुलीचा जन्म झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: satish kaushik birthday special know about his interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.