गायिका सारू माइनी दिसणार '५ वेडिंग्स' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:31 PM2018-10-22T18:31:51+5:302018-10-22T18:33:35+5:30

म्युझिक व व्हिडिओ अल्बममधून रसिकांच्या भेटीला आलेली गायिका व अभिनेत्री सारू माइनी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

SARU MAINI DEBUTS IN HOLLYWOOD FILM 5 WEDDINGS | गायिका सारू माइनी दिसणार '५ वेडिंग्स' चित्रपटात

गायिका सारू माइनी दिसणार '५ वेडिंग्स' चित्रपटात

Next
ठळक मुद्दे '५ वेडिंग्स' सिनेमात गायिकेच्या भूमिकेत सारू माइनी

म्युझिक व व्हिडिओ अल्बममधून रसिकांच्या भेटीला आलेली गायिका व अभिनेत्री सारू माइनी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे नाव '५ वेडिंग्स' असून हा इंडियन अमेरिकन सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सारूसोबत अभिनेता राजकुमार राव व नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


सारू माइनीचे संगीतावर खूप प्रेम असून तिला गायिका म्हणून कॅमेऱ्यासमोर प्रेझेंट करायला खूप आवडते. '५ वेडिंग्स' सिनेमात तिने गायिकेची भूमिका बजावली आहे. या चित्रपटात लोकप्रिय गाणे लाँग गवाचा टीसीरिजसोबत रिक्रिएट करण्यात आले आहे. हे गाणे सारूने गायले असून ती या गाण्यात दिसणार आहे. यातील भूमिकेविषयी ती म्हणाली की, या चित्रपटात मी गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नामध्ये मी संगीत सोहळ्यात लाँग गवाचा हे गाणे गाताना दिसणार आहे. हे चित्रपटातील प्रमोशनल साँग आहे. 
'५ वेडिंग्स' चित्रपटात अमेरिकेत राहणाऱ्या एका महिला पत्रकाराची कथा दाखवण्यात आली आहे. ही भूमिका नरगिस फाखरी करताना दिसणार आहे. भारतावर आधारीत बातम्या दिल्या तर माझे प्रमोशन होऊ शकते असे नरगिसला वाटत असते. तिचा बॉस तिला भारतात जाण्याची परवानगी देतो. नर्गिस भारतातील लग्न कव्हर करायला निघते. भारतात तिची ओळख एका पोलिस अधिकाऱ्यासोबत होते. जो खास तिच्या सुरक्षेसाठी तैनात केला गेला असतो. हा पोलिस अधिकारी म्हणजे अर्थातच राजकुमार राव. हा पोलिस अधिकारी प्रत्येक बाबतीत नर्गिसवर संशय घेतो आणि याच प्रवासात नर्गिस राजकुमारच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक आहे. चित्रपटात नर्गिस व राजकुमार यांच्याशिवाय हॉलिवूड कलाकार कँडी क्लार्क, बो डेरेक आणि एनेलिस वॅन डर पूल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नम्रता सिंह गुजराल दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SARU MAINI DEBUTS IN HOLLYWOOD FILM 5 WEDDINGS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app