बॉलिवूड अभिनेत्री सारिकाचा आज वाढदिवस आहे. सारिकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतारा आले. सारिकाने इंडस्ट्रीमधील आतापर्यंत सगळ्यात यशस्वी बालकलाकार आहे. घरची परिस्थिती फारशी ठीक नव्हती. आई-वडील वेगळे झाले होते. पैशासाठी आई तिला सिनेमात काम करायला लावायची.  


आईची वागणूक खूप वाईट होती. एकदा, जेव्हा त्याने कामाच्या बदल्यात मिळालेल्या 1500 रुपयांमधून पुस्तके विकत घेतली, तेव्हा आईने तिला बेदम मारले होते. शेवटी आईच्या वागणुकीला कंटाळून तिने घर सोडले. बालकलाकार म्हणून तिच्या कामासाठी मिळालेल्या पैशातून मुंबईत पाच अपार्टमेंट खरेदी केले गेले. मात्र यातील एकही तिच्या नावावर नव्हते हे जेव्हा सारिकाला कळले तेव्हा ती आतून खचली गेली. त्याच दरम्यान कम विल हसनची एंट्री तिच्या आयुष्यात झाली, कसलाही विचार न करता ती त्याच्यासोबत राहू  लागली. सिनेमा सोडून ती चेन्नईला शिफ्ट झाली. 


तिचे करिअर यशाच्या शिखरावर असताना कमल हसन यांच्या प्रेमात बुडालेल्या सारिकाने सगळे काही सोडले होते. त्याचवेळी कमल हासनचा पूर्व पत्नी वाणीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू होता. यामुळे कमल हासन आर्थिकदृष्ट्या कमजोर झाले होते. अशा वेळी तो सारिकाशी लगेच लग्न करण्यास तयार नव्हता. सारिका कमलबरोबर लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहायला सुरुवात केली तेव्हा असे संबंध मान्य नव्हते. सारिका लग्नाच्या आधीच प्रग्नेंट झाली होती त्यानंतर दोघांनी लग्न केले. . 


पण कमलसोबत राहण्याच्या वेळीच सारिकाला हे समजण्यास सुरवात झाली की हे नाते फार काळ टिकणार नाही. 1988 मध्ये या दोघांनी लग्न करुन आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sarika birthday special know how she struggles with life gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.