Sara ali khan shares stunning photos from maldives vacation | Hotness Alert! सारा अली खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, दिसली जबरदस्त लूकमध्ये

Hotness Alert! सारा अली खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, दिसली जबरदस्त लूकमध्ये

सारा अली खान  मालदीवमध्ये  व्हॅकेशन  एन्जॉय करते आहे. तिथे पोहोचल्यावर तिने चाहत्यांसाठी सुंदर फोटो शेअर केले आहेत.  लॉकडाऊन संपल्यानंतर बॉलिवूडचे बरेच सेलेब्स मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले आहेत. साराच्या या फोटोना चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत सारा नेहमीच जास्त सजग असते.

 सारा अली खानचे इन्स्टाग्रामवर 29.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.  ती वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. साराने शेअर केलेल्या मालदीवच्या फोटोंमध्ये ती खूप हॉट आणि बोल्ड दिसतेय. 

 वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासमवेत आनंद एल रायच्या ‘अतंगी रे’ चित्रपटात दिसणार आहेपहिल्यांदा, अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. धनुषबद्दल सांगायचे झाले तर त्याने आनंद एल राय यांच्या सुपरहिट सिनेमा 'रांझणा'मध्ये त्याने काम केले आहे.. हा 2021 मधील मोस्टअवेटेड सिनेमा आहे. या सिनेमाला ए.आर. रहमान संगीत देणार आहे.  यापूर्वी सारा वरुण धवनच्या अपोझिट 'कुली नंबर 1' मध्ये दिसली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara ali khan shares stunning photos from maldives vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.