आता काय तर सोशल मीडियावर सारा अली खानच्या मोनोकनीच्या किमतीची चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:39 AM2021-01-28T11:39:09+5:302021-01-28T11:39:45+5:30

नुकतेच साराने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत.

sara ali khan shares picture in monokini which cost 4 thousand rupees see photos on instagram | आता काय तर सोशल मीडियावर सारा अली खानच्या मोनोकनीच्या किमतीची चर्चा!!

आता काय तर सोशल मीडियावर सारा अली खानच्या मोनोकनीच्या किमतीची चर्चा!!

googlenewsNext
ठळक मुद्देसाराच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, अलीकडेच तिचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच साराने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. विशेषत: तिच्या आकाशी रंगाच्या मोनोकनीमधील फोटोंवर चाहते असे काही फिदा झालेत की, या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. इतकेच नाही तर यानंतर सोशल मीडिया युजर्सनी काय करावे तर साराने घातलेल्या आकाशी रंगाच्या या मोनोकनीची किंमतही शोधून काढली.

ऐकून आश्चर्य होईल पण त्याची किंमत केवळ साडेचार हजार रुपये आहे. एका सोशल मीडिया युजरने तिच्या मोनोकनीची किंमत शोधून काढल्यानंतर ती पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. 


 
अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह मालदीवला सुट्टीसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम देखील होता. या सहलीचे अनेक फोटो साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

साराच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, अलीकडेच तिचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अर्थात तिचा हा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात सारा अली खान आणि वरुण धवन मुख्य भूमिका दिसले. लवकरच सारा‘अतरंगी रे; या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: sara ali khan shares picture in monokini which cost 4 thousand rupees see photos on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.