हिंदी चित्रपटसृष्टीत सेलिब्रिटींची मुलं पालकांचं घर सोडून वेगळ्या घरात राहण्याचा ट्रेंड सुरु आहे. यांत आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी नवं स्वतःचे घर खरेदी केले आहे किंवा लवकरच खरेदी करणार आहेत. सेलिब्रेटी बनल्यानंतर या कलाकारांनी आई- वडिलांचेघर सोडत स्वतंत्र राहत आहेत. मध्यंतरी सारानेही आईचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता तिच्या चाहत्यांनाही धक्कादायक वाटले होते.  सारा आईचे घर सोडून कार्तिक आर्यनसोबत राहायला तर जात नाही ना अशी शंकासुद्धा अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केली होती.

साराचे घरातल्या काही वस्तूंसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.या फोटोत सारा एका कारच्या मागच्या बाजूला उभी दिसते. कारच्या मागच्या बाजूला डिक्कीत अनेक सामानाने भरलेले बॉक्स दिसले. कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या म्हणजे सारा घर सोडून जात असल्याच्या तयारीत दिसत अशा चर्चा झाल्या. यावेळी सारा प्रचंड चिंताग्रस्त झाल्याचंही फोटोत पाहायला मिळाले. आईचे घर सोडून दुसरीकडे जातेस का असा प्रश्न हा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी विचारला होता. मात्र सारा किंवा तिच्या कुटुंबीयांनी  सारा घर सोडून दुसरीकडे जात असल्याच्या या फोटोला दुजोरा दिला नव्हता.


सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास आता बॉलिवूडमधील ड्रग्सच्या वापरापर्यंत येऊन पोहोचलाय. या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक टॉप अभिनेत्री जसे की, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीने समन्स पाठवला होता आणि या केसबाबत त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. इंटरनेटवर काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, साराने एनसीबीसमोर मान्य केलं होतं की, ती सुशांतला डेट करत होती आणि हेही सांगितलं की, दोघांचं ब्रेकअप का झालं होतं.

ड्रग्स प्रकरणात आपल्या मुलीला सैफला मदत करायची इच्छा नाही?

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सारा अली खान सध्या चारही बाजूने या प्रकरणात अडकली आहे मात्र यातून बाहेर पडण्यासाठी ती सैफवर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. रिपोर्टनुसार सैफ आली खान या प्रकरणात सारा अली खानची कोणतीच मदत करत नाहीय.

सैफने अमृता सिंगलाही फटकारले 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सैफने पूर्वपत्नी अमृता सिंगला सुद्धा चांगलेच फटकारले आहे, जी मुलीच्या करिअ संबंधित जवळजवळ सर्व निर्णय घेते. सैफ अली खान पत्नी करिना कपूरसोबत दिल्लीत रवाना झाला आहे.

Also Read: सारा अली खानच्या अडचणीत वाढ; जुन्या फोनमध्ये रियासोबतचे सापडले ड्रग्स चॅट, NCB च्या सूत्रांचा खुलासा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara Ali Khan moves out of Amrita Singh's house: Here's to new beginnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.