सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून 'लव आज कल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून ती अक्षय कुमार, सारा अली खानधनुष एकत्र काम करताना दिसणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. मात्र आता दिग्दर्शकाने चित्रपटाच्या टायटलसोबत जाहीर केलं आहे. त्यामुळे आता सारा की तो निकल पडी म्हणायला काहीच हरकत नाही आहे.

सुशांत सिंग राजपूत, रणवीर सिंग, कार्तिक आर्यननंतर सारा अली खान आता अक्षय कुमारधनुष सोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'अतरंगी रे'. 

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार आनंद एल राय यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केले होते. त्यांनी या चित्रपटाचे नाव 'अतरंगी रे' सांगितलं होते. तसेच स्टारकास्टबद्दलही सांगितले. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या स्पेशल रोलबद्दल सांगताना ते म्हणाले की, त्याचा रोल खूप चॅलेंजिंग आहे. अक्षयचे कौतूक करताना म्हटले की, त्या पात्रासाठी एका अनुभवी कलाकाराची गरज होती आणि याच कारणामुळे अक्षयची निवड केली.


पहिल्यांदाच सारा व धनुषला रुपेरी पडद्यावर सादर करण्याबाबत त्यांनी सांगितले की, दोघांना एकत्र पाहणे इंटरेस्टिंग व एक्साइटिंग होणार आहे.चाहत्यांना ही जोडी नक्कीच आवडेल.


यादरम्यान, सारा अली खानने इंस्टाग्राम अकाउंटवर अक्षय व धनुषसोबतचा क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय व धनुष साराच्या गालावर किस करताना दिसत आहेत. 


'अतरंगी रे' चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत तर या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिमांशु शर्मा यांनी लिहिली आहे. सारा अली खान, अक्षय कुमार व धनुष यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं कमालीचं ठरणार आहे.

Web Title: Sara Ali Khan gets lottery! Now, with these two Bollywood stars coming to shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.