‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:30 AM2019-09-16T11:30:24+5:302019-09-16T11:30:32+5:30

संजयने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. एकदा डाकूंनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता, हेही त्याने सांगितले.

sanjay dutt reveals that dacoits give to kidnap threats to him in fornt of sunil dutt |  ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

 ‘डाकू रूपा’ने केला होता संजूबाबाच्या अपहरणाचा प्रयत्न, वाचा सविस्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे राजकीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी सिनेमा आहे.

संजय दत्त सध्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संजय पत्नी मान्यतासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला. यादरम्यान संजयने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत.  एकदा डाकूंनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला होता, हेही त्याने सांगितले.
‘मुझे जीने दो’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी डाकूंनी तुझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, अशी एक अफवा आहे. ही अफवा खरी आहे का? असा सवाल कपिलने संजयला केला. यावर होय, ही अफवा खरी आहे, असे संजय म्हणाला आणि त्याने ती अख्खी घटनाच सांगितली.



‘रूपा नावाचा कुख्यात डाकू त्यावेळी गँगचा म्होरक्या होता. मी त्यावेळी अगदीच लहान होतो. रूपा डाकू माझ्या जवळ आला आणि त्याने मला आपल्या कडेवर घेतले. या चित्रपटासाठी आत्तापर्यंत तुम्ही किती पैसे खर्च केलेत, असे त्याने माझे वडील सुनील दत्त यांना विचारले. माझ्या वडिलांनी 15 लाख असे उत्तर दिले. यावर, या मुलाला (कडेवरच्या संजय दत्तला) मी उचलून नेलेच तर तुम्ही किती देणार? असा उलट प्रश्न त्याने माझ्या वडिलांना केला. या घटनेनंतर सुनील दत्त यांनी माझी आई आणि मला परत मुंबईला पाठवले, असे संजयने सांगितले.




संजय दत्तचा ‘प्रस्थानम’  हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टाने केले आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून संजय दत्त तब्बल १२ वषार्नंतर बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफसोबत झळकणार आहे.



 

संजय दत्त व जॅकी श्रॉफ व्यतिरिक्त मनीषा कोईराला, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर व सत्यजीत दुबे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.   राजकीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी सिनेमा आहे.

Web Title: sanjay dutt reveals that dacoits give to kidnap threats to him in fornt of sunil dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.