Sanjay Dutt can't go to US for cancer treatment? Know the reason | संजय दत्तला कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत जाता येणार नाही? जाणून घ्या कारण

संजय दत्तला कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत जाता येणार नाही? जाणून घ्या कारण

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे संजय दत्त उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. आपण चित्रिकरणापासून काही वेळ लांब राहणार असल्याची माहिती मंगळवारी संध्याकाळी संजय दत्तनं ट्विटरच्या माध्यमातून दिली. वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेत असल्याचं संजय दत्तनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

धक्कादायक; मुंबईकर क्रिकेटपटूची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, आता अशी एक गोष्ट समोर येत आहे की, संजय दत्तला अमेरिकेत जाता येणार नाही. एबीपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार संजय दत्तकडे अमेरिकेत जाण्याचा व्हिसा नाही आहे. व्हिसा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.  

एबीपीच्याच वृत्तानुसार संजय दत्तवर अमेरिकेतील मेमोरियल स्लोआन कॅटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. मुंबई ब्लास्ट प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते.  जर त्याला व्हिसा मिळवता आला नाही, तर दुसरा पर्याय म्हणून तो सिंगापूरला जाऊ शकते. याबाबत अजूनही त्याच्या कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही.

संजय दत्तला कर्करोग झाल्याचे समजताच त्याची पत्नी मान्यता दत्त दोन मुलांसह विशेष विमानानं दुबईहून थेट मुंबईत दाखल झाली. मार्च महिन्यापासून ती दुबईत होती.  
 

अन्य महत्त्वाचे बातम्या

अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह! 

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Dutt can't go to US for cancer treatment? Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.