बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. त्याच्या लग्नाचा विषय निघताच गेल्या काही वर्षात कॅटरिना कैफचे नाव निघायचे. मात्र सलमानने त्याचा वारंवार इन्कार केला. सोशल मीडियार कॅटरिनाचे लाखो चाहते आहेत. तिचे विविध अंदाजातील फोटोंमुळे चाहते घायाळ होतात. तिचा ट्रेडिशनल अंदाज असो किंवा मग बोल्ड हॉट अंदाज प्रत्येकावर चाहते फिदा नाही झाले तरच नवल.  बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी कॅटरिना एक आहे.  बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. त्याचबरोबर तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली.आज कतरिना कैफ हे नाव बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री मानली जाते. 


बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिना कैफला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.तिने म्हटले होते की, लग्न करायचे असे काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात नक्कीच होते. पण काही कारणांनी त्यावेळी ते शक्य होऊ शकले नाही. तुमच्या आयुष्यात ज्या प्रमाणे गोष्टी लिहून ठेवल्या असतात, त्याच प्रकारे त्या घडतात असे मला वाटते. त्यामुळे त्या गोष्टींविषयी आता मी विचार करणे बंद केले आहे. 


माझ्या आयुष्यात काही गोष्टी माझ्या मर्जीप्रमाणे झाल्या नाहीत. त्याचा त्रास देखील मला खूप सहन करावा लागला. पण आता मी सगळ्या गोष्टी देवावर सोडल्या आहेत. योग्य वेळी ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल याची मला खात्री आहे. आता हा व्यक्ती सलमान तर नाही ना यावरही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This Salman Khan's Actress is more gorgeous than Aishwarya Rai, know About Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.