करोडोची मालमत्ता असूनही सलमान खान का राहातो छोट्याशा फ्लॅटमध्ये, त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:24 PM2020-03-19T13:24:02+5:302020-03-19T14:03:28+5:30

सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच सांगितले आहे.

Salman Khan on why he never shifted from Galaxy Apartment PSC | करोडोची मालमत्ता असूनही सलमान खान का राहातो छोट्याशा फ्लॅटमध्ये, त्यानेच केला खुलासा

करोडोची मालमत्ता असूनही सलमान खान का राहातो छोट्याशा फ्लॅटमध्ये, त्यानेच केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानने सांगितले होते की, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. माझे आई-वडील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये माझ्याच वरच्या मजल्यावर राहातात. त्यामुळे एखाद्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमानचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. त्याचे सगळेच चित्रपट 100 करोडोहून अधिकचा गल्ला जमवतात. सलमान एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. पण असे असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो.

सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच एका चॅट शो मध्ये सांगितले होते. सलमान आणि गॅलेक्सी अपार्टमेंटचे नाते खूपच जवळचे आहे. त्याने या घरात राहाण्याविषयी सांगितले होते की, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. माझे आई-वडील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये माझ्याच वरच्या मजल्यावर राहातात. त्यामुळे एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं मला माझ्या कुटुंबासारखी आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर थकून गार्डनमध्येच झोपायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. आम्ही कोणाच्याही घरात जायचो, जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो.

सलमान खानचे गॅलेक्सीमधील घर छोटे असले तरी ते शानदार आहे. या अर्पाटमेंटमध्ये त्यांची दोन घरं असून एक घर ग्राऊंड फ्लोअरवर तर दुसरे फर्स्ट फ्लोअरवर आहे. सलमानचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहातात तर सलमान ग्राऊंड फ्लोअरवर राहातो. जनसत्तानुसार, सलमानचे घर हे वन बीएचके असून यात एक छोटेसे किचन देखील आहे. हा फ्लॅट एल शेप मध्ये असून यातील बेडरूम १७० ते १९० सक्वेअर फूट इतकेच आहे.

Web Title: Salman Khan on why he never shifted from Galaxy Apartment PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.