ठळक मुद्देदबंग या चित्रपटातील मख्खी पांडे या भूमिकेसाठी अरबाजला विचारले त्यावेळी चुलबुल पांडे ही भूमिका इरफान खान अथवा रणदीप हुड्डा यांनी साकारावी अशी अभिनवची इच्छा होती.

दबंग या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात सलमानने साकारलेली चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. या चित्रपटाची सगळीच गाणी चांगलीच गाजली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील संवाद देखील लोकांच्या तोंडपाठ झाले होते. या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि सलमानच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, दबंग या चित्रपटासाठी सलमान खान हा दिग्दर्शक अभिनव कश्यप याची पहिली पसंती नव्हता. ही गोष्ट खुद्द अरबाज खाननेच एका मुलाखतीत सांगितली आहे.

दबंग या चित्रपटाची कथा लिहून झाल्यानंतर मख्खी पांडे या व्यक्तिरेखेसाठी अरबाजला अभिनव कश्यपने विचारले होते. त्याविषयी अरबाजने एका मुलाखतीत सांगितले आहे की, दबंग या चित्रपटातील मख्खी पांडे या भूमिकेसाठी मला विचारले त्यावेळी चुलबुल पांडे ही भूमिका इरफान खान अथवा रणदीप हुड्डा यांनी साकारावी अशी अभिनवची इच्छा होती. पण या दोघांपैकी कोण या चित्रपटात काम करेल हे काहीच ठरत नव्हते. मी चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर या चित्रपटाची निर्मिती करण्याविषयी विचारले आणि सलमानने चुलबुल पांडेची भूमिका साकारावी असे सुचवले. अभिनव लगेचच या गोष्टीसाठी तयार झाला आणि अशाप्रकारे सलमानची एंट्री दबंग या चित्रपटात झाली. 

सध्या सलमान दबंग 3 या त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत असून या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षी याआधी सलमानसोबत दबंग आणि दबंग 2 या चित्रपटात झळकली होती. दबंग 3 या चित्रपटात आता चुलबूल पांडेचा भूतकाळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दबंग या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना आता दबंग 3 या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय दबंग आणि दबंग 2 या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमान सध्या या चित्रपटासाठी वजन कमी करत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan was not the first choice to play Chulbul Pandey in Dabangg reveals Arbaaz Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.