11 वर्षांनी मोठ्या रेखांचा पाठलाग करायचा सलमान खान, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:39 PM2021-04-14T16:39:29+5:302021-04-14T16:42:44+5:30

होय, तेव्हा रेखा या सलमानच्या शेजारी राहायच्या. खुद्द रेखा यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता.

salman khan was carzy for actress rekha want to marry her | 11 वर्षांनी मोठ्या रेखांचा पाठलाग करायचा सलमान खान, पण का?

11 वर्षांनी मोठ्या रेखांचा पाठलाग करायचा सलमान खान, पण का?

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ‘राधे’ या सिनेमानंतर तो ‘एक था टायगर’ सीरिजच्या तिस-या पार्टमध्ये दिसणार आहे.

सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’  (Radhe: Your Most Wanted Bhai)  हा आगामी सिनेमा येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. अर्थात कोरोनाचे वाढते संक्रमण बघता याबद्दल संभ्रम आहे. चर्चा खरी मानाल, कोरोनामुळे या ईदला हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही तर जुलैमधील बकरी ईदच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित होईल. भाईजानच्या सिनेमाच्या रिलीजची अशी चर्चा सुरु असतानाच त्याच्याबद्दलचा एक जुना किस्साही व्हायरल होतोय. हा किस्सा सदाबहार अभिनेत्री रेखाशी (Rekha) जुळलेला आहे.

होय, तेव्हा रेखा या सलमानच्या शेजारी राहायच्या. खुद्द रेखा यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता. त्यांनी सांगितले होते की, सलमान कायम मला फॉलो करायचा. मी जिथे जाईल, तिथे तो माझा पिच्छा करायचा. आम्ही शेजारी राहायचो, तेव्हाची ही गोष्ट आहे. अगदी मला पाहण्यासाठी त्याने मी जायचे तो योगा क्लासही ज्वाईन केला होता.

पुढे सलमाननेही याची कबुली दिली होती. मी रेखा यांच्याबद्दल प्रचंड क्रेजी होता. त्यांच्याशी मला लग्नही करायचे होते, असे त्याने सांगितले होते. रेखा यांच्यामुळेच मी अन्य कोणाशीही लग्न केले नाही, असेही तो हसत हसत म्हणाला होता.
तुम्हाला माहित आहेच की, रेखा या सलमानपेक्षा 11 वर्षांनी मोठ्या आहेत.

सलमानचे नाव अनेकींनी जोडले गेले. संगीता बिजलानीसोबत तर सलमानने लग्नाची तयारीही केली होती. अगदी लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण ऐनवेळी संगीताने हे लग्न मोडले होते. असे म्हणतात की, तिने सलमानला एका मुलीसोबत रंगेहात पकडले होते. यानंतर सोमी अली, ऐश्वर्या राय या सलमानच्या आयुष्यात आल्या. पण यांच्यासोबतचे त्याचे नातेही अपयशी ठरले. कतरिना कैफ, युलिया वंतूर आदींसोबतही सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ‘राधे’ या सिनेमानंतर तो ‘एक था टायगर’ सीरिजच्या तिस-या पार्टमध्ये दिसणार आहे. याचे शूटींगही सुरु झाले आहे. याशिवाय शाहरूख खानच्या ‘पठाण’ या सिनेमात तो कॅमिओ रोलमध्ये झळकणार आहे.

Web Title: salman khan was carzy for actress rekha want to marry her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.