बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. त्याच्या लग्नाचा विषय निघताच कॅटरिना कैफचे नाव निघायचे. मात्र सलमानने त्याचा वारंवार इन्कार केला. मग त्याचे नाव ल्युलिया व्हॉन्च्युअर हिच्याशी जोडले  गेले. मात्र या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. 

ऐश्वर्यानंतर सलमानची कोणाशी  जास्त जवळीक वाढली तर ती होती अभिनेत्री कॅटरिना कैफ. त्यामुळे दोघे लग्न करणार असे बोललं जात होते. पुन्हा एकदा लग्नाचा विचार नसल्याचे सलमानने जाहीर केले आणि त्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. 

कटरिनाने देखील सलमानसह काम करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. सलमानसह चांगली मैत्री असतानाही कटरिनाची रणबीर कपूरसह अफेअर असल्याच्याही चर्चा रंगायच्या. रणबीरमुळे कटरिना सलमानपासून दूर गेल्याचे बोलले गेले. मात्र 2016मध्ये रणबीर आणि कटरिनाचे ब्रेकअप झालं. 

रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे. त्याचे कारण कॅटरिना कैफ असल्याचे बोलले जाते. ब्रेकअपनंतरही सलमानने रणबीरला माफ केले नाही. तर कटरिनासह पूर्वीसारखी मैत्री ठेवली नाही. 

दरम्यान सलमान छोट्या छोट्या गोष्टींवरून कटरिनासह वाद घालायचा. २००८ मध्ये त्याने कटरिनासह जोरदार भांडण केले होते. सलमानला कटरिनाचा इतका राग आला होता की, त्याने थेट कटरिनावर हात उगारला होता. तेव्हापासून कटरिना सलमान पूर्वीसारखे एकत्र दिसले नाही. 

कटरिनाच्या मनात आजही सलमानविषयी प्रेम आहे. वेगवेगळ्या पुरस्कासोहळ्यांमध्ये कटरिना आणि सलमानविषयी असलेले प्रेमही पाहायला मिळते. सगळ्याच गोष्टी शब्दांत बोलणे गरजेचे नसते. 

अगदी त्याचप्रमाणे कटरिनाच्या डोळ्यात सलमानविषयी प्रेम दिसून येते. वारंवार कटरिना सलमानवर किती प्रेम करत याचीही प्रचिती चाहत्यांना येते.  २०१९मध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड शो दरम्यान कॅट आणि रणबीरची भेट झाली. तसे पाहिला गेले तर रणबीर आणि कॅटरिना एकमेकांच्या समोरा समोर येण्याचे टाळत असतात.

मात्र पहिल्यांदा फिल्मफेअरच्या निमित्ताने दोघांचा सामना झाला दोघांनी जुने वाद विसरुन गळाभेट घेतली. हे चित्र पाहुन दोघांमधील जुनं वाद विसरुन पुन्हा एकदा नव्याने मित्र झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan still Angry with Katrina Kaif because of Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.