Salman Khan rushes to the aid of theater owners, 'Radhe' to be screened in cinemas | थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

भाईजान सलमान खानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे सगळे वेळापत्रकच विस्कटले. आता थिएटर सुरू झाले पण प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे चित्रपटगृह मालकांची पूर्वीप्रमाणे कमाई देखील होत नाही. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत.यामुळे चित्रपटगृहाचे मालक चांगलेच वैतागले आहेत आणि त्यांना मोठ्या नुकसानाला सोमोरे जावे लागत आहे. आता सलमान खान त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. 

सोशल मीडियावर सलमानने जाहीर केले की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. सलमानने लिहिले की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो. यामुळे मी माझा आगामी चित्रपट राधे हा चित्रपटगृहात प्रदर्शित करून त्यांना मदत करणार आहे. सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सर्व काळजी त्यांनी घ्यावी. यंदा ईदवर राधे चित्रपट सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चे सॅटेलाईट, थिएटर रिलीज, डिजिटल रिलीज व म्युझिक राईट्स झी स्टुडिओला विकण्यात आले आहेत. ही डिल कितीची तर तब्बल 230 कोटींची. म्हणजेच काय तर रिलीज होण्याआधीच या सिनेमाने 230 कोटी कमावले आहेत. या डिलची बातमी खरी मानाल तर कोरोना काळातील बॉलिवूडची ही सर्वात मोठी डिल आहे. या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा असतील. 


याशिवाय सलमान खान ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ या सिनेमात दिसणार आहे. यात सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा लीड रोलमध्ये आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात आयुष आणि सलमान दोघेही एकदम हटके लूकमध्ये दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan rushes to the aid of theater owners, 'Radhe' to be screened in cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.