ठळक मुद्देमाझा लग्न संस्थेवर विश्वासच नाहीये. जोडीदार असावा असे मी मानतो. पण लग्नावर माझा विश्वास नाहीये. 

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हा बॉलिवूडमधील सुपरस्टार असून त्याचे सगळेच चित्रपट हिट होतात. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. आता लवकरच तो प्रेक्षकांना भारत या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटातील त्याचा लूक खूपच वेगळा आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन तो करत आहे. याच दरम्यान त्याला लग्न करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

सलमान खानचे फॅन फॉलोव्हिंग हे प्रचंड आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला नेहमीच मुलाखतींमध्ये विचारला जातो आणि सलमान देखील या प्रश्नाला मजेशीररित्या उत्तरं देत असतो. सलमान खान लग्न कधी करणार हा एक जागतिक प्रश्न बनला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

भारत या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलमानने सांगितले की, माझा लग्न संस्थेवर विश्वासच नाहीये. जोडीदार असावा असे मी मानतो. पण लग्नावर माझा विश्वास नाहीये. 

सलमानला लग्नाबाबत काही महिन्यांपूर्वी देखील विचारण्यात आले होते. त्यावर त्याने सांगितले होते की, माझ्या लग्नाबाबात खूप साऱ्या लोकांना चिंता लागलेली आहे याचा मला प्रचंड आनंद होतो. पण मी लग्न केल्यास यांना काय फायदा होणार हेच मला कळत नाही. लग्न कधी होणार तेव्हा होणार... होणार नसेल तर ते होणार नाही.

सलमानच्या आयुष्यात आजवर संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्री आल्या. पण आजही त्याने लग्न केले नाही. संगीतासोबत तर त्याच्या लग्नाची पूर्ण तयारी देखील झाली होती. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले. सध्या तो युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. 


Web Title: Salman Khan Reveals The Real Reason Behind Not Marrying
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.