salman khan revealed that he was not first choice of dabangg | सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय
सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय

ठळक मुद्दे‘दबंग’ हा सिनेमा अभिनव कश्यपने दिग्दर्शित केला होता.

सुपरस्टार सलमान खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या 20 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. साहजिकच चुलबुल पांडे पुन्हा एकदा येणार म्हटल्यावर भाईजानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. खरे तर  चुलबुल पांडेच्या आयकॉनिक कॅरेक्टरमध्ये सलमानशिवाय अन्य कुठल्याही अभिनेत्याची आता कल्पनाही करता येणार नाही. पण आधी चुलबुल पांडेची ही भूमिका सलमान नाही तर दुस-याच एका अभिनेत्याला ऑफर झाली होती. खुद्द सलमानने एका मुलाखतीत ही माहिती दिली.


पिंकविला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सलमानने हा खुलासा केला. ‘दबंग’ सिनेमात चुलबुल पांडेची भूमिका सर्वप्रथम मला ऑफर झाली नव्हती. यासाठी सर्वप्रथम अभिनेता रणदीप हुड्डा याचे नाव फायनल झाले होते. चित्रपटाचे बजेट फारच कमी होते. केवळ 2 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये चित्रपट सुरु झाला होता. तेव्हा अरबाज आणि रणदीप ही जोडी ठरली होती. पण अचानक अरबाजने हा चित्रपट मला ऑफर केला. त्याने मला विचारल्यावर सहा-आठ महिन्यानंतर मी संपूर्ण कथा ऐकली. पण त्यावेळी चुलबुल पांडेची भूमिका मला निगेटीव्ह वाटली होती. चित्रपटाच्या सुरुवातीला एकही गाणे नव्हते. शिवाय चुलबुलच्या आईला कुणी मारले, याचाही कथेत उल्लेख नव्हता. मी त्यादृष्टीने कथेत काही बदल सुचवले. हे बदल मान्य केले गेलेत आणि मी हा चित्रपट स्वीकारला, असे सलमानने यावेळी सांगितले.


‘दबंग’ हा सिनेमा अभिनव कश्यपने दिग्दर्शित केला होता. 2010 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. यानंतर 2012 मध्ये ‘दबंग 2’ आला. हा पार्ट अरबाज खानने दिग्दर्शित केला होता. आता याचा तिसरा भाग ‘दबंग 3’ प्रभुदेवाने दिग्दर्शित केला आहे. यात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर लीड रोलमध्ये आहेत.

Web Title: salman khan revealed that he was not first choice of dabangg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.