ठळक मुद्देसलमान या मुलाखतीत म्हणत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला. 

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. तो सध्या युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने किंवा युलियाने कधीच ही गोष्ट मान्य केलेली नाही. सलमानच्या वयाची पन्नाशी पार झाली असली तरी आजही तो अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. सलमान कधी लग्न करणार हा त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. त्याला अनेक मुलाखतींमध्ये याबाबत विचारले जाते आणि तो देखील त्याच्या अंदाजात यावर नेहमीच उत्तर देतो.

सलमानने नव्वदीच्या दशकातील एका आघाडीच्या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून जुही चावला आहे. नव्वदीच्या दशकात जुहीने अनेक हिट चित्रपट दिले होते. त्यावेळी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याच्या देखील अनेकजण प्रेमात पडले होते. सलमानची एक जुनी मुलाखत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मुलाखतीत सलमान जुहीची खूप सारी प्रशंसा करत असताना आपल्याला दिसत आहे. सलमान या मुलाखतीत म्हणत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला. 

जुही आणि सलमान कधीच नायक-नायिका म्हणून कोणत्या चित्रपटात झळकले नाहीत. जुहीने करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात 2014 मध्ये सांगितले होते की, मी अनेक समांरभात त्याच्याकडे पाहाते पण तो मला पाहून अक्षरशः पळ काढतो असे मला वाटते. कधी कधी तर मला पाहून मला तो ओळखतच नाही अशाप्रकारे वागतो.

दिवाना मस्ताना या चित्रपटात अनिल कपूर, गोविंदा आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. 

Web Title: Salman Khan really wanted to marry Juhi Chawla at one time, but then this happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.