सलमान खानने पूर्ण केले 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे शूटिंग, सेटवरील हा व्हिडीओ आला समोर

By गीतांजली | Published: October 14, 2020 05:47 PM2020-10-14T17:47:53+5:302020-10-14T17:54:08+5:30

काही दिवसांपूर्वी सलमानने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती.

Salman khan radhe shooting completed know something new about film | सलमान खानने पूर्ण केले 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे शूटिंग, सेटवरील हा व्हिडीओ आला समोर

सलमान खानने पूर्ण केले 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चे शूटिंग, सेटवरील हा व्हिडीओ आला समोर

googlenewsNext

सलमान खानचा आगामी सिनेमा  'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'ची शूटिंग पूर्ण झाले आहे. 2 ऑक्टोबरपासून सलमानने शूटिंगला सुरुवात केली होती. आपलले राहिले शूटिंग पूर्ण करण्यसाठी सलमान सेटवर परतला होता. राधे सलमान खानच्या मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी एक आहे, सलमान खान फिल्म्सच्या ऑफिशियल हँडलने सोशल मीडियावर  एक व्हिडिओ पोस्ट करून शूटिंग संपवल्याचे सांगितले आहे. सलमानने एनडी स्टुडिओमध्ये राधेचे शूटिंग केले. फायनल पॅचअप वर्क महबूब स्टुडिओमध्ये करण्यात येईल. राधे सिनेमाचं १० दिवसांचं शूटींग शिल्लक होतं जे सलमानने पूर्ण केले.. ज्यात एक गाणं आणि क्लायमॅक्स शूट केले आहे.

अलीकडेच सलमानने  बिहाइंड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे सेटवर कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे. व्हिडीओत सिनेमाचा सेट दाखवण्यात आलाय. तर या व्हिडीओला अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा व्हॉइस ओव्हर देण्यात आला होते.

‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा प्रभुदेवा दिग्दर्शित करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा सिनेमा ईदला रिलीज होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर थिएटरही बंद झाले होते. आता शूटींग पुन्हा सुरू झालं आहे. पण सध्याच सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही.
VIDEO : कोरोनाच्या भीतीने 'राधे'चं शूटींग कसं करतोय बघा सलमान खान, दिशासोबत गाणं होतंय शूट....

 

Web Title: Salman khan radhe shooting completed know something new about film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.