ठळक मुद्दे9 जुलैला संगीताच्या वाढदिवसाला सलमानने बॉलिवूडमधील त्याच्या जवळच्या व्यक्तींना पार्टी दिली. या पार्टीला युलिया वँटर, डेसी शाह, साजिद नाडियाडवाला, मोहनिश बहल उपस्थित होते.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. तो सध्या युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने किंवा युलियाने कधीच ही गोष्ट मान्य केलेली नाही. सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. 

सलमानची आजही त्यांच्या अनेक एक्स गर्लफ्रेंडसोबत खूप चांगली मैत्री आहे. त्याने नुकतीच त्याची पूर्व प्रेयसी संगीता बिजलानीसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. 9 जुलैला संगीताच्या वाढदिवसाला सलमानने बॉलिवूडमधील त्याच्या जवळच्या व्यक्तींना पार्टी दिली. या पार्टीला युलिया वँटर, डेसी शाह, साजिद नाडियाडवाला, मोहनिश बहल उपस्थित होते. संगीताने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच सलमानने या पार्टीतील त्याचा आणि प्रभू देवा यांचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. मोहनिशची पत्नी अभिनेत्री आरती बहल, डेसी शाह यांनी देखील या पार्टीतील धमाल मस्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जसीम खान यांनी सलमान खानच्या आयुष्यावर बीईंग सलमान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, संगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती.

पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने या गोष्टीविषयी अनेक वर्षांनंतर मीडियात कबूल देखील केले होते. 

सलमानने देखील ही गोष्ट करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात मान्य केली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते, तिला तो फसवतो आहे हे तिला कळल्यामुळे तिने हे लग्न मोडले होते. सलमानसोबत लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan Hosts Grand Birthday Bash for Ex-girlfriend Sangeeta Bijlani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.