Salman khan is going to make mulshi pattern remake in hindi | सलमान खान बनवणार या मराठी चित्रपटाचा रिमेक
सलमान खान बनवणार या मराठी चित्रपटाचा रिमेक

ठळक मुद्देआयुषच्या आगामी चित्रपटाची देखील निर्मिती त्याचा मेहुणा सलमान खान करणार आहे आणि हा चित्रपट मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा रिमेक असणार आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात ओम भुतकरने साकारलेली भूमिका आयुष साकारणार आहे. या चित्रपटाचे हक्क सलमानने विकत घेतले असून लवकरच तो या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. 

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. 

मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या यशात आता आणखी एक भर पडली आहे. या चित्रपटाचे कथानक मराठी इंडस्ट्रीलाच नव्हे तर बॉलिवूडला देखील भावले आहे. कारण या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचे ठरले आहे आणि हा हिंदी रिमेक दुसरे कोणी नाही तर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करणार आहे आणि या चित्रपटात त्याचा मेहुणा आयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

आयुष शर्मा लव्हयात्री या चित्रपटानंतर एका अॅक्शन चित्रपटात झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण हा चित्रपट कोणता असणार याबाबत आयुषने मौन पाळणेच पसंत केले होते. पण मिळालेल्या माहितीनुसार, आयुषच्या आगामी चित्रपटाची देखील निर्मिती त्याचा मेहुणा सलमान खान करणार आहे आणि हा चित्रपट मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाचा रिमेक असणार आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात ओम भुतकरने साकारलेली भूमिका आयुष साकारणार आहे. या चित्रपटाचे हक्क सलमानने विकत घेतले असून लवकरच तो या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. 

आयुष या सोबतच आणखी एका चित्रपटात अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि या चित्रपटात संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Salman khan is going to make mulshi pattern remake in hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.