ठळक मुद्देझरीन म्हणाली, जर माझ्या अफेअरच्या चर्चा रंगल्या तर माझे नाव सलमानसोबत जोडले जावे... ही अफवा मला नक्कीच माझ्याबाबतीत ऐकायची आहे. एवढेच नव्हे तर सलमान माझ्याशी लग्न करणार अशी देखील चर्चा माझ्याबाबतीत व्हावी असे मला वाटते.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. तो सध्या युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने किंवा युलियाने कधीच ही गोष्ट मान्य केलेली नाही. सलमानच्या वयाची पन्नाशी पार झाली असली तरी आजही तो अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. सलमान कधी लग्न करणार हा त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. त्याला अनेक मुलाखतींमध्ये याबाबत विचारले जाते आणि तो देखील त्याच्या अंदाजात यावर नेहमीच उत्तर देतो.

सलमानसोबत लग्न करण्याची इच्छा आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. सलमानने आजवर अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. झरीन खानने सलमानच्याच वीर या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि झरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले होते. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. पण आता सलमानमुळे झरीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

झरीनने काही दिवसांपूर्वी नुकतीच पिंकव्हिला या वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिच्या करियरसंबंधी तसेच तिच्या खाजगी आयुष्याविषयी भरभरून गप्पा मारल्या. याच मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, तुझ्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या तर या चर्चा काय असतील असे तुला वाटते. त्यावर झरीनने एक गंमतीशीर उत्तर दिले. ती म्हणाली, जर माझ्या अफेअरच्या चर्चा रंगल्या तर माझे नाव सलमानसोबत जोडले जावे... ही अफवा मला नक्कीच माझ्याबाबतीत ऐकायची आहे. एवढेच नव्हे तर सलमान माझ्याशी लग्न करणार अशी देखील चर्चा माझ्याबाबतीत व्हावी असे मला वाटते.

बॉलिवूडमध्ये ब्रेक दिल्यानंतर सलमानने झरीन खानला अभिनय शिकण्यात तसेच फिटनेसच्याबाबतीत मार्गदर्शन केले आहे.

  


 

Web Title: ‘Salman Khan is getting married to me’, says Zareen Khan when asked to spread a rumour about herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.