ठळक मुद्देसलमान एका चित्रपटासाठी 60 कोटी इतके मानधन घेतो. गेल्या काही वर्षांतील बॉक्स ऑफिसचा ट्रेंड पाहिला तर सलमानचे सगळेच चित्रपट 100 कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करतात.

बॉलिवूडमधील कलाकारांना एका चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन मिळते हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल. तसेच बॉलिवूडमधील कोणता कलाकार सगळ्यात जास्त मानधन मिळवतो हे तुम्हाला माहीत आहे का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.बॉलिवूडमध्ये तीन खानांचा दबदबा असल्याचे आपण नेहमीच म्हणतो. हे तिन्ही खान एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देतात. याच तिघांपैकी बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान चित्रपटात काम करण्यासाठी सगळ्यात जास्त मानधन घेतो. लोकमत न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान एका चित्रपटासाठी 60 कोटी इतके मानधन घेतो. गेल्या काही वर्षांतील बॉक्स ऑफिसचा ट्रेंड पाहिला तर सलमानचे सगळेच चित्रपट 100 कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करतात. त्यामुळे सलमान चित्रपटात आहे म्हटल्यावर तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असेच म्हटले जाते. सलमानच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भारतने बॉक्स ऑफिसवर खूप चांगला व्यवसाय केला होता. त्याचा दबंग 3 हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.सलमाननंतर दुसऱ्या क्रमांकावर आमिर खान असून आमिर एका चित्रपटासाठी 45 कोटी घेतो. आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.


आमिरनंतर पुढच्या क्रमांकावर तिसरा खान म्हणजेच शाहरुख खान असेल असेच तुम्हाला वाटले असेल ना... पण हे खरे नाहीये. शाहरुखपेक्षा अधिक मानधन अक्षय कुमार घेतो. त्याला एका चित्रपटासाठी 40-45 कोटी इतके मानधन मिळते तर शाहरुख खान एका चित्रपटासाठी 40 कोटींचे मानधन घेतो.हृतिक रोशन 30-40 कोटी तर शाहिद कपूर 35 कोटी इतके मानधन घेतो तर रणबीर कपूरला 30 कोटी रुपये इतके मानधन मिळते. अजय देवगण 25 कोटी, अमिताभ 20 कोटी, रणवीर सिंग 15 कोटी तर सैफ 15 कोटी इतके मानधन घेतो. 

 

Web Title: salman khan is earning more in bollywood among all stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.