Salman Khan did not allow Katrina Kaif to work with John Abraham, because reading would be annoying | सलमान खानने कतरिनाला जॉनसोबत काम करण्यासाठी दिली नव्हती परवानगी, कारण वाचून व्हाल हैराण

सलमान खानने कतरिनाला जॉनसोबत काम करण्यासाठी दिली नव्हती परवानगी, कारण वाचून व्हाल हैराण

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याचदा रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. दोघांनी टाइगर जिंदा है, भारत, पार्टनर, मैंने प्यार क्यों किया यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. या सुपरहिट चित्रपटांसोबत दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा ऐकायला मिळते. इतकेच नाही तर दोघांच्या लग्नाबद्दल अनेकदा लोकांनी चर्चा केली आहे. मात्र दोघांनी हे नाकारले आहे.


यादरम्यान कतरिना कैफ आणि रणबीर कपूरच्या नावाचीदेखील खूप चर्चा झाली. दोघांचे प्राइव्हेट व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. मात्र आता त्या दोघांचे ब्रेकअप झाले. आता कतरिना कैफ विकी कौशलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. कतरिना आणि विकी यांच्या खासगी भेटी आणि पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


मात्र तुम्हाला माहित आहे का की कतरिना कैफ आणि सलमान खान बराच काळ एकत्र राहिले आहेत. दोघांनी एकमेकांना डेट केले आहे. २००९ साली रिलीज झालेला चित्रपट न्यूयॉर्कमध्ये कतरिना कैफला मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली होती. त्यावेळी ती सलमान खानला डेट करत होती. पण सलमान खानला कतरिनाने जॉनसोबत काम करू नये असे वाटत होते. कारण जॉनने कतरिनाला तिच्या पहिल्या सिनेमातून काढले होते.


२००३ साली कतरिना कैफचे साया चित्रपटासाठी निवड झाली होती. मात्र जॉनने तिला रिजेक्ट केले होते. त्याचे म्हणणे होते की, कतरिना कैफला हिंदी येत नाही. या सिनेमात जॉन मुख्य भूमिकेत होता. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. कतरिनाला एका रात्रीच्या सीनच्या शूटिंगसाठी बोलवले होते. हा एक सायलेंट शॉट होता आणि कतरिनाला भूताची भूमिका करायची होती. मात्र दोन दिवसांच्या शूटनंतर तिला रिप्लेस करण्यात आले. कारण जॉनला वाटले होते की तिला हिंदी नीट बोलता येत नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan did not allow Katrina Kaif to work with John Abraham, because reading would be annoying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.