Salman Khan Birthday : एक किस्सा...! पारोच्या पायातील काटा काढणारा ‘तो’ हात शाहरूखचा नाही तर सलमानचा आहे...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:00 AM2021-12-27T08:00:00+5:302021-12-27T08:00:06+5:30

Salman Khan Birthday : तो सलमान व ऐश्वर्याच्या शेवटचा शॉट. त्यानंतर सलमान व ऐश्वर्या कधीच कॅमे-यापुढे एकत्र आले नाहीत...

Salman Khan Birthday special salman khan shoot this scene with aishwarya rai in devdas movie | Salman Khan Birthday : एक किस्सा...! पारोच्या पायातील काटा काढणारा ‘तो’ हात शाहरूखचा नाही तर सलमानचा आहे...!!

Salman Khan Birthday : एक किस्सा...! पारोच्या पायातील काटा काढणारा ‘तो’ हात शाहरूखचा नाही तर सलमानचा आहे...!!

Next

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान (Salman Khan). आज सलमानचा वाढदिवस (Salman Khan Birthday). सलमानचा वाढदिवस म्हटला की, त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai ) अधु-या प्रेम कहाणीचा उल्लेख हमखास होतो. ऐश्वर्याच्या प्रेमात सलमान वेडा झाला होता. ( Aishwarya rai and Salman khan love story) याचे एक ना अनेक किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आहे ‘देवदास’  (Devdas ) या आयकॉनिक सिनेमाच्या सेटवरचा. ज्येष्ठ सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या ‘किंग ऑफ बॉलिवूड शाहरूख खान’ या चित्रपटात हा किस्सा लिहिला आहे.

‘देवदास’मध्ये सलमान नव्हता. पण ऐश्वर्या होती. या चित्रपटात संजय लीला भन्साळींनी शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांना कास्ट केलं होतं. इकडे ‘देवदास’चं शूटींग सुरू झालं आणि तिकडे सलमान व ऐश्वर्याच्या प्रेम कहाणी जवळजवळ संपुष्टात आली होती. सलमानचा लहरी स्वभाव, त्याने केलेली कथित मारहाण यामुळे ऐश्वर्या त्याच्यापासून दुरावू लागली होती. पण सलमान मुळातच हट्टी. ऐश्वर्याला मिळवण्यासाठी, प्रेम वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरुच  होती...

‘देवदास’चं शूटींग सुरु झालं तसा रोज सलमान या चित्रपटाच्या सेटवर दिसू लागला होता. शाहरूख व भन्साळी चांगले मित्र असल्याने त्याला कोण हटकणार होतं? ऐश्वर्या शूटींगमध्ये असायची आणि सलमान तिच्या व्हॅनिटीत तिची वाट पाहत तासन् तास पडून राहायचा. त्याला कशाचंही भान नसायचं.

एकदा ऐश्वर्या आणि शाहरूख यांचा एक रोमॅन्टिक सीन शूट होत होता. पारोच्या पायात काटा रूततो आणि देवदास तो हळूच बाहेर काढून फेकतो, असा तो सीन... पण का कुणास ठाऊक शाहरूखला अनेक प्रयत्न करूनही हा सीन जिवंत करता येईना. रिटेकवर रिटेक सुरू होते. अशात अचानक सलमान आला आणि त्याने शाहरूखला बाजूला होण्याचा इशारा केला. तो हळूच ऐश्वर्याजवळ गेला आणि त्यानं हळूवारपणे तिच्या पायातून काटा काढून दाखवला.... शाहरूखनं नंतर हुबेहुब सलमानची कॉपी केली आणि तो सीन अजरामर केला.

म्हणायला सलमान शाहरूखला सीन शिकवतं होता. पण त्याची इतकी नॅचरल अ‍ॅक्टिंग याआधीच कुणीच पाहिली नव्हती. वाचून आश्चर्य वाटेल पण ‘मोरे पिया’ या गाण्यातील सुरूवातीच्या एका फ्रेममध्ये पारोच्या पायातील काटा काढणारा हात शाहरूखचा नाही तर सलमानचा आहे. तो सलमान व ऐश्वर्याच्या शेवटचा शॉट. त्यानंतर सलमान व ऐश्वर्या कधीच कॅमे-यापुढे एकत्र आले नाहीत. ख-या आयुष्यात तर ऐश्वर्याने सलमानचं नाव कधीच पुसून टाकलं होतं.

Web Title: Salman Khan Birthday special salman khan shoot this scene with aishwarya rai in devdas movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app