ठळक मुद्देसाऊथ स्टार राणा दग्गुबाती, विष्णु विशान, पुलकित सम्राट स्टारर ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा येत्या 26 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

कोरोना काळात ठप्प पडलेल्या चित्रपटगृहांचे चित्र या वर्षात बदलण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात अनेक सिनेमे थेट चित्रपटगृहांत रिलीज होत आहेत. अलीकडे यशराज बॅनरने आपल्या 5 सिनेमांच्या रिलीजची घोषणा केली. आत्तापर्यंत 20 सिनेमांच्या रिलीज डेट फायनल झाल्या आहेत. येत्या मार्च महिन्यातही मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यावर एक नजर...
 
रूही

मार्च महिन्यात रिलीज होणाºया पहिल्या मोठ्या सिनेमाचे नाव आहे, ‘रूही’. जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा हा हॉरर थ्रीलर सिनेमा येत्या 11 मार्चला प्रदर्शित होतोय.
 
टाईम टू डान्स

कतरिना कैफची बहीण इजाबेल कैफचा मार्च महिन्यात धमाकेदार डेब्यू होतोय. तिच्या सिनेमाचे नाव आहे, ‘टाइम टू डान्स’. यात सूरज पांचोली इसाबेलचा हिरो आहे. 12 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
 
मुंबई सागा

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा 19 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अंडरवर्ल्डवर आधारित या सिनेमात जॉनचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहेत. साहजिकच त्याचे चाहते उत्सुक आहेत.

 संदीप और पिंकी फरार

अर्जुन कपूर व परिणीती चोप्रा स्टारर ‘संदीप और पिंकी फरार’ हा सिनेमा दीर्घकाळापासून रखडला होता. अखेर या सिनेमाला प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला आहे.  हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

फौजी कॉलिंग

शर्मन जोशी आपल्या चाहत्यांसाठी ‘फौजी कॉलिंग’ हा सिनेमा घेऊन येतोय. सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा 12 मार्चला रिलीज होणार आहे.

हाथी मेरे साथी

साऊथ स्टार राणा दग्गुबाती, विष्णु विशान, पुलकित सम्राट स्टारर ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा येत्या 26 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: roohi to mumbai saga these are bollywood movies release in march 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.