बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाची नवीन वेबसीरिज कँडी लवकरच वूट सिलेक्टवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत रोनित रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  'कँडी' ही वेबसीरिज प्रेक्षकांना रोमांचक प्रवासावर घेऊन जाणार आहे. 

याबाबत बोलताना रोनित रॉय म्‍हणाले, ''मी अनेक प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूपच नशीबवान आहे. यामुळे मला भरपूर शिकण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. डिजिटल मनोरंजन युगाच्‍या प्रारंभासह प्रत्‍येकासाठी चांगले काम आहे आणि अनेक लोक अत्‍यंत प्रेरणादायी व हृदयस्‍पर्शी काम उत्तमप्रकारे करत आहेत. माझ्या मते, अनेक संधी आहेत आणि या संधी वाढतच जातील. मला काही सर्वोत्तम ओटीटी शोजचा भाग असण्‍याचा अभिमान वाटतो.

तो पुढे म्हणाला की, आता मी सिरीज 'कँडी'साठी काम सुरू करण्‍यास उत्‍सुक असून त्याची वाट पाहत आहे. मी अशी प्रबळ संकल्‍पना घेऊन येण्‍यासाठी वूट सिलेक्‍टच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानतो. माझी भूमिका जटिल व आव्‍हानात्‍मक आहे, ज्‍यामुळे संपूर्ण पटकथा अधिक रोमांचक बनते. माझा विश्‍वास आहे की, ही सिरीज एक रोमांचपूर्ण राइड असणार आहे आणि मी ही सिरीज तुमच्‍यासमोर सादर होण्‍यासाठी अत्‍यंत उत्सुक आहे.'' 


रिचा चड्डा म्‍हणाली, ''मला या पटकथेकडे आकर्षून घेतलेली बाब म्‍हणजे शोमधील माझ्या भूमिकेत असलेल्‍या विविध छटा. ही थ्रिलर/ सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्‍या भूमिका साकारण्‍याकडे मी नेहमीच आकर्षून गेले आहे आणि ही अगदी परिपूर्ण संधी होती. अर्थातच, रोनित सारख्‍या प्रतिभावान कलाकारासोबत काम करणे अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. मी पहिल्‍यांदाच त्‍याच्‍यासोबत, तसेच नकुल सहदेव, मनु रिषी चढ्डा यासारख्‍या सर्वोत्तम कलाकारांसोबत काम करत आहे. मी दिग्‍दर्शक आशिष शुक्‍ला यांच्यासोबत काम करण्‍यासाठी देखील अत्‍यंत उत्‍सुक आहे. ते माझ्या करिअरच्‍या सुरूवातीला इंडस्‍ट्रीमध्‍ये प्रथम भेटलेल्‍या काही व्यक्तींपैकी एक आहेत.''  


रोनित रॉय व रिचा चड्डासोबत शोमध्‍ये मनु रिषी चढ्डा व नकुल सहदेव देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सिरीजचे दिग्‍दर्शन आशिष आर. शुक्‍ला यांनी केले असून ऑप्टिमिस्टिक्‍स एंटरटेन्‍मेंटची निर्मिती आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ronit Roy will be seen with Richa Chadda in 'Candy' webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.