ठळक मुद्देमधूने 1999 मध्ये आनंद शहा या व्यवसायिकासोबत लग्न केले. तिला दोन मुली असून ती जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलींना देते.

मधू या अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड, कन्नड, मल्याळम, तेलगू, तमीळ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. फूल और काटे या चित्रपटात मधू अजय देवगणच्या नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मधूने रोजा, दिलजले, यशवंत यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मधू ही प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची भाची असून ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मधू हिंदी चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती आजही दाक्षिणात्य चित्रपटात झळकते. आजही तिला तिथे तितकीच लोकप्रियता आहे. मधूचे खरे नाव मधुबामा रघुनाथ असून तिने फूल और काटे या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली होती. मधूने 1999 मध्ये आनंद शहा या व्यवसायिकासोबत लग्न केले. तिला दोन मुली असून ती जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलींना देते. मधू ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली नर्तिकादेखील आहे. तिने अनेक वर्षं नृत्याचे धडे गिरवले असून तिच्या नृत्यावर तिचे फॅन्स नेहमीच फिदा आहेत. 

मधूने काही वर्षांपूर्वी आरंभ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण या मालिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या कभी सोचा भी ना था या चित्रपटात ती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तसेच मिस्टर कलाकार या 2011 च्या चित्रपटात देखील तिने काम केले होते. सध्या मधू चित्रपटांमध्ये का दिसत नाही याविषयी तिने एका मुलाखतीत सांगितले होते. ती म्हणाली होती की, मी मुलांच्या पालनपोषणात व्यग्र असल्याने मी काही वर्षं काम करत नव्हते. पण आता मी परदेशात अथवा दक्षिणेतील एखाद्या राज्यात स्थायिक झाली असल्याचा अनेकांचा समज आहे. मला काम करण्यात रस नाहीये असे इंडस्ट्रीतील लोकांना आता वाटत असल्याने मला ऑफर मिळणे देखील बंद झाले आहे. खरे तर मी मुंबईतच राहात असून मला हिंदी चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल. 

Web Title: Roja actress Madhoo looks now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.