rohit shetty is trending after vikas dubey encounter | विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय रोहित शेट्टी? वाचाल तर कळेल

विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय रोहित शेट्टी? वाचाल तर कळेल

ठळक मुद्देरोहित शेट्टी त्याच्या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊन्टरमध्ये ठार झाला. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. याचदरम्यान विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. विकास दुबेच्या एन्काऊन्टरनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. आता कारण काय तर पुढे वाचा...

विकास दुबेच्या एन्काऊंटरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात पोलिसांच्या अपघातानंतर पलटलेल्या गाडीचाही फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडिया युजर्सनी या सीनची तुलना  रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी करणे सुरु केले. पाठोपाठ यावरचे मीम्स व्हायरल झालेत.
रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. हवेत गाड्या उडणारे आणि गाड्या पलटण्याचे सीन्स त्याच्या सिनेमात असतातच असतात. विकास दुबेच्या एन्काऊंटरवेळीही असेच झाले आणि हे पाहून युजर्सची कल्पना शक्ती जागृत झाली आणि मीम्सचा पाऊस पडला. अनेक युजर्सनी रोहितला कॉपी राइट क्लेम करण्याचा सल्ला दिला.
 पाहुयात यावरचे काही मजेदार मीम्स...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rohit shetty is trending after vikas dubey encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.