Rohit Shetty Postphone Release Of Suryavanshi | बॉलिवूडची सलमान-अक्षय टक्कर टळली,सूर्यवंशीच्या रिलीजची तारीख ठरली.......
बॉलिवूडची सलमान-अक्षय टक्कर टळली,सूर्यवंशीच्या रिलीजची तारीख ठरली.......

ठळक मुद्दे 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. पुढच्या ईदला दबंग सलमान खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यात रुपेरी पडद्यावर वॉर चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे.

ईदच्या मुहूर्तावर बॉलीवुडमध्ये फक्त भाईजान सलमान खानच्या चित्रपटांचा रुपेरी पडद्यावर दबदबा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पुढच्या ईदला दबंग सलमान खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यात रुपेरी पडद्यावर वॉर रंगणार असल्याचं बोललं जात होतं. पुढील ईदला संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर इन्शाअल्लाह हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या. 

 

त्यामुळे रसिक कुणाला पसंती देणार अशी चर्चा रंगली. अखेर यांत रोहित शेट्टीने एक पाऊल मागे घेतले आहे. रोहितने त्याच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलंय.  


मी कायम रोहितला माझा लहान भाऊ समजलं आहे, ते त्यानं सिद्ध करून दाखवलं आहे असं ट्विट सलमाननं केलं आहे. यावेळी सलमाननं रोहितसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. 'सूर्यवंशी' चित्रपट यापूर्वी ईदला प्रदर्शित होणार असं म्हटलं जात होतं. रोहित शेट्टीनं सलमानशी  बोलूनच ही तारीख ठरवली असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळींनी 'इंशाअल्लाह' या  त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होत असल्यानं आता 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख  पुढे ढकलण्यात आलीय. 


Web Title: Rohit Shetty Postphone Release Of Suryavanshi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.