मुनमुन सेनची मुलगी पुन्हा आली चर्चेत, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 03:22 PM2019-11-08T15:22:04+5:302019-11-08T15:23:05+5:30

मुनमुन सेनची मुलगी आहे इतकी सुंदर...!!

riya sen hot photoshoot pics gone viral | मुनमुन सेनची मुलगी पुन्हा आली चर्चेत, काय आहे कारण?

मुनमुन सेनची मुलगी पुन्हा आली चर्चेत, काय आहे कारण?

googlenewsNext
ठळक मुद्दे2001 मध्ये ‘स्टाईल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

स्टाईल, झनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी अशा सिनेमात झळकलेली रिया सेन काही काळ चर्चेत आली आणि अचानक गायब झाली. आता रिया सेनची चर्चा होतेय ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. होय, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रियाच्या या बोल्ड फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


रिया सेन बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अर्थात याऊपरही बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. तूर्तास तरी बोल्ड  फोटोशूट करून सा-यांचे लक्ष वेधून घेणे हेच तिचे काम.  

‘ डोकं नसलेली एक अभिनेत्री’ अशी रियाची प्रतिमा बॉलिवूडमध्ये निर्माण झाली होती. रियाला ती इमेज तिला बदलायची होती. त्यामुळेच तिने  बंगाली सिनेमांच्या आॅफर्स स्विकारल्या आणि काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. अनेक तेलगू व तामिळ चित्रपटांतही तिने काम केले आहे.


रियाही अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे. २०१७ मध्ये रियाने बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधली. हे एक सीक्रेट मॅरेज होते.


कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र इतकेच या लग्नाला हजर होते. हे लग्न इतक्या घाईघाईत झाले की, यानंतर रिया लग्नापूर्वी प्रेग्नंट आहे, अशी चर्चा पसरली. पण नंतर ही चर्चा अफवा निघाली. 2001 मध्ये ‘स्टाईल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात ती शर्मन जोशीसोबत दिसली होती.

Web Title: riya sen hot photoshoot pics gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.