Riya Chakraborty reveals big names, NCB in preparation for operation | रिया चक्रवर्तीने केला मोठ्या नावांचा खुलासा, कारवाईच्या तयारीत NCB

रिया चक्रवर्तीने केला मोठ्या नावांचा खुलासा, कारवाईच्या तयारीत NCB

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आला. त्यानंतर एनसीबीने कारवाई करत रिया चक्रवर्तीला अटक केली. यानंतर कोर्टाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. रियाने जामीन मागितला असला तरी त्यावेळी कोर्टाने नकार दिला. त्यानंतर रियाची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आजही सत्र न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.


टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, काही बॉलिवूड सेलिब्रेटींची नावे ड्रग्समध्ये समोर आली आहेत. त्यांना एनसीबीने समन्स बजावला आहे. जवळपास २५ ए लिस्टर बॉलिवूड सेलिब्रेटीं असून यात अॅक्टर, डिरेक्टर, कास्टिंग डिरेक्टर, प्रोडक्शन हाउसेस आणि इतर लोकांचा समावेश आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी ड्रग्स खरेदी, वापर आणि पेडलिंगमध्ये सहभाग घेतला आहे.

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

एनसीबी काळजीपूर्वक करणार कारवाई
या रिपोर्टमध्ये पुढे नमूद करण्यात आलंय की, यादीतील नावे खूपच प्रतिष्ठीत आहेत आणि म्हणूनच एनसीबी काळजीपूर्वक या प्रकरणात लक्ष ठेवत आहे.
दिल्लीत सध्या केपीएस मल्होत्रा आणि एनसीबीचे डीजी अस्थाना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. या बैठकीत ते पुढे कशी चौकशी सुरू ठेवणार आहेत यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर !
 

रियाने केला मोठा खुलासा
एनसीबीच्या तिसर्‍या दिवशी चौकशीत रिया चक्रवर्तीने ड्रग्स घेतल्याची माहिती पहिल्यांदाच अडखळत सांगितली. यापूर्वी रिया ठाम होती की तिने कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riya Chakraborty reveals big names, NCB in preparation for operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.