सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आतापर्यंत म्हणत होती की ती ड्रग्सचे सेवन कधीच करत नाही. मात्र आता तिचे पितळ उघडे पडले आहे. रियाने मुंबई सेशन कोर्टात जामीन अर्ज करत आपण निरपराध आहोत आणि आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रिया खोटं बोलत असल्याचं समोर आले आहे.


रियाने ड्रग्स सेवन करत असल्याचे आरोप फेटाळले आहेत, त्यानंतर झी न्यूजने रियाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी सुशांत आणि रियाचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात स्पष्ट दिसते आहे की रिया ड्रग्सचे सेवन करते आहे आणि ती खोटं बोलते आहे. हा व्हिडिओ २ मिनिटं ५४ सेकंदाचे आहेत. 

ही रोल सिगरेट आहे - रिया चक्रवर्ती
या व्हिडिओत ऐकू येतंय की व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती विचारतो की हे चरस नाही आहे? त्यावर सुशांत बोलतो की हे VFX आहे. VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट कोणत्याही व्हिडिओत जेव्हा स्पेशल इफेक्ट्स टाकला जातो. ही फिल्म इंडस्ट्रीची टेक्निकल भाषा आहे जी नेहमी लोक सऱ्हास बोलताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की सुशांत सिंग राजपूत सांगतो आहे की त्याला ही नशा केल्यावर व्हीएफएक्स सारखे स्पेशल इफेक्ट्स असल्यासारखे वाटते आहे. तिथेच रिया चक्रवर्ती म्हणते आहे की ही रोल सिगरेट आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र व्हिडिओत होत असलेल्या बातचीतमध्ये त्या व्यक्तीचाही समावेश आहे. 


नशेत सुशांत गातोय भजन
दुसऱ्या व्हिडिओत सुशांत सिंग राजपूत भजन गाताना दिसतो आहे. नशेचा परिणाम झाल्यानंतर सुशात आणि त्याचे साथीदार भजन गायला सुरूवात करतात. सुशांत चांगला गायकदेखील होता. त्याला बऱ्याचदा गाताना पाहिले गेले आहे. तो शंकराचा भक्त आहे. त्याचे काही व्हिडिओ आपण पाहिले आहेत ज्यात तो भजन गात आहे. नशा केल्यानंतर व्यक्ती काल्पनिक जगात असतो त्याला अशा काही गोष्टी दिसतात ज्या वास्तविकतेत नसतात. झी न्यूजने हे दोन अनसीन व्हिडिओ शेअर करत रिया ड्रग्सचे सेवन करत असल्याचे त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.


रिया म्हणते, मी निरपराध
'आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,' असे रियाने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे. आज रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Exposed ... Video of Riya Chakraborty taking drugs came to light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.